मयत कर्जदाराच्या वारसाला रवळनाथतर्फे मदतीचा धनादेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मयत कर्जदाराच्या वारसाला रवळनाथतर्फे मदतीचा धनादेश
मयत कर्जदाराच्या वारसाला रवळनाथतर्फे मदतीचा धनादेश

मयत कर्जदाराच्या वारसाला रवळनाथतर्फे मदतीचा धनादेश

sakal_logo
By

19637
चंदगड : श्रीमती तुपारे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करताना एम. एल. चौगुले, प्रा. व्ही. के. मायदेव, डी. के. मायदेव, पुष्पा नेसरीकर, गुरुनाथ काणेकर आदी.

मयत कर्जदाराच्या वारसाला
‘रवळनाथ’तर्फे मदतीचा धनादेश
चंदगड, ता. ६ : रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीच्या येथील शाखेतर्फे मृत कर्जदार सभासद विठ्ठल गोपाळ तुपारे (रा. मजरे कार्वे, ता. चंदगड) यांच्या वारसांना १२ लाख ६० हजार रुपयांची मदत करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, शाखाध्यक्षा पुष्पा नेसरीकर, नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे सीनिअर डिव्हिजन मॅनेजर अविनाश कांबळे, शरद टोपले यांच्या उपस्थितीत तुपारे यांच्या पत्नीकडे रकमेचा धनादेश प्रदान करण्यात आला.
संस्थेने तुपारे यांना ५ जून २०१३ ला घर बांधकामासाठी १२ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. त्या वेळी ‘रवळनाथ’च्या व्यवस्थापनाकडून त्यांना अपघात विमा पॉलिसी घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी ही पॉलिसी घेतली होती. त्यानुसार कंपनीकडून १२ लाख आणि रवळनाथ संस्थेच्या सभासद कल्याण निधीतून ६० हजार रुपये असा १२ लाख ६० हजार रुपयांचा धनादेश श्रीमती तुपारे यांच्याकडे देण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. के. मायदेव, शाखा सल्लागार गुरुनाथ काणेकर, नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे असिस्टंट मॅनेजर शामराव माने, नीलेश शेटे, शरद टोपले, शाखाधिकारी दीपक शिंदे उपस्थित होते. ‘सीईओ’ डी. के. मायदेव यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55313 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top