
पाणंद रस्त्यामुळे प्रगतीला चालना ः तहसीलदार अहिर
19652
भादवण (ता. आजरा) ः दाखले व सातबाऱ्याचे ग्रामस्थांना वाटप करताना तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ. शेजारी संजय पाटील, राजन दड्डीकर आदी.
पाणंद रस्त्यामुळे प्रगतीला चालना
---
तहसीलदार अहिर; भादवण येथे सातबारा उताऱ्यांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
भादवण, ता. ६ : पाणंद रस्ते खुले झाल्यास शेतातील माल बाजारपेठेपर्यंत पाठविणे सुखकर होते. यासाठी शेतकऱ्यांनीच अतिक्रमणे हटवून पाणंद रस्ते तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यामुळे गावच्या प्रगतीला चालना मिळेल, असे प्रतिपादन तहसीलदार विकास अहिर यांनी केले.
भादवण (ता. आजरा) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात घरठाण व सातबारा उताऱ्याचे एक हजार ६०० ग्रामस्थांना मोफत वाटप करण्यात आले. या वेळी अहिर बोलत होते. गटविकास अधिकारी बी. डी. वाघ प्रमुख उपस्थित होते. सरपंच संजय पाटील अध्यक्षस्थानी होते.
ग्रामविकास अधिकारी राजन दड्डीकर यांनी स्वागत केले. माजी उपसरपंच दयानंद पाटील यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार अहिर म्हणाले, की घरठाण पत्रक व सातबारा वर्षातून एकदा तरी काढला पाहिजे. रस्ते खुले करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. सरपंच संजय पाटील यांचे काम उल्लेखनीय असून, त्यांचा प्रशासनाकडे कामांसाठी सतत पाठपुरावा असतो. सरपंच पाटील म्हणाले, की ग्रामस्थांना दिलेल्या वचनांची पूर्ती झालेली आहे. मंडल अधिकारी खरात, तलाठी रमेश यादव, पोलिसपाटील गीता कुंभार, उपसरपंच बाळासाहेब कुंभार, ग्रामपंचायत सदस्य राहुल देसाई, सुनंदा कुंभार, सुनंदा पाटील, बेबीताई लोहार, रत्नाबाई केसरकर, अशोक गुरव, जितू पाटील, टी. ए. पाटील, देवस्थान समितीचे सचिव दिनकर गोडसे, तानाजी उंडगे, श्रावण पाटील, प्रमोद घाटगे, शांताराम पाटील उपस्थित होते. सदाशिव दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55330 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..