कोवाड-अंकुशचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड-अंकुशचा मृत्यू
कोवाड-अंकुशचा मृत्यू

कोवाड-अंकुशचा मृत्यू

sakal_logo
By

१९६३५

किटवाडच्या तरुणाची
मृत्यूशी झुंज अपयशी
कोगनोळीजवळ अपघातात जखमी अंकुशचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ५ ः किटवाड (ता. चंदगड) येथील अंकुश नरसू पाटील (वय २९) या तरुणाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. अंकुश पुण्यात नोकरीला होता. यावर्षी लग्नाचे नियोजन होते. मुली पाहण्यासाठी पंधरा दिवसांतून तो गावी येत होता. १० एप्रिलला तो दुचाकीवरून घरी येत असताना कोगनोळी टोल नाक्यासमोर मालवाहू ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. जखमी अंकुशने अपघात झाल्याची बातमी फोनवरून घरच्यांना कळवली. दरम्यान, जखमी अवस्थेत त्याला निपाणी व नंतर कोल्हापुरात खासगी दवाखान्यात दाखल केले होते. दुसऱ्या दिवसापासून त्याची प्रकृती अधिकच गंभीर होत गेली. उपचाराला साथ देत नसल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती; पण त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. कुटुंब, नातेवाइकांसह ग्रामस्थ व मित्रमंडळी आपापल्या परीने मदत करत होते. अंकुशची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. जीवाच्या आकांताने अंकुशने तब्बल चोवीस दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर बुधवारी त्याची प्राणज्योत मालवली. रात्री उशिरा मृतदेह गावी आणून अंत्यविधी केला. गरीब शेतकरी कुटुंबातील तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55331 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top