
मंदिर हेच मन:शांतीचे ठिकाण ः गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी
19655
मुगळी : सोमलिंग मंदिर जीर्णोद्धारानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी. शेजारी राजू खमलेट्टी, रमेश आरबोळे, कुमार हिरेमठ स्वामीजी, राणी खमलेट्टी, रायगोंडा पाटील आदी.
मंदिर हेच मन:शांतीचे ठिकाण
गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी; मुगळीत सोमलिंग मंदिर कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. ५ : माणूस भौतिक सुखाच्या मागे धावत सुटला आहे. भौतिक सुख हे क्षणभंगुर स्वरुपाचे आहे. त्यामुळे मानवी जीवन दुःखमय झाले आहे. माणसाला आत्मिक शांतीचा विसर पडला आहे. शाश्वत मनःशांतीसाठी मंदिर हेच मुख्य ठिकाण आहे, असे प्रतिपादन सुरगीश्वर मठाचे मठाधिपती श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील जीर्णोद्धार केलेल्या ग्रामदैवत श्री सोमलिंग मंदिराची वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण कार्यक्रमांना प्रारंभ झाला. याप्रसंगी महास्वामीजी बोलत होते. कुमार हिरेमठ स्वामीजी (कारदगा) यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुमार हिरेमठ स्वामीजी म्हणाले, ‘माणसाजवळ कितीही सत्ता, संपत्ती असली तरीही असमाधानी आहे. जीवनामध्ये गुरू हा सर्वश्रेष्ठ आहे. फक्त मंदिर आणि मूर्ती असून उपयोग नाही. त्याच्यामध्ये चैतन्य भरण्याचे काम गुरुकडून होते. म्हणून गुरूला मोठे स्थान आहे. गुरुशिवाय जीवनाला मोक्ष प्राप्त होत नाही.’
जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रमेश आरबोळे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी मंदिर जीर्णोद्धाराचा आढावा घेतला. गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींच्या हस्ते मंदिराच्या आवारात बेलाच्या झाडाचे रोपण करण्यात आले. मंदिर बांधकामाला सहकार्य केल्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य राणी खमलेट्टी व त्यांचे पती राजू खमलेट्टी यांचा सत्कार झाला. हिरा शुगर्सचे संचालक सोमगोंडा आरबोळे, उपसरपंच रूपा धुळाज, प्रियांका आरबोळे, समितीचे उपाध्यक्ष बाळगोंडा पाटील, रायगोंडा पाटील, अशोक महाडिक, आप्पासाहेब जाधव, गजानन पाटील, डी. पी. पाटील, श्रवण आरबोळे, सुधाकर शिंदे, निंगापा माने आदी उपस्थित होता. विवेक स्वामी यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55334 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..