शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षा
शिक्षा

शिक्षा

sakal_logo
By

१९६७५

पळसंबेतील एकाला
जन्मठेपेची शिक्षा
मालमत्तेच्या वादातून सावत्र आईचा खून

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः मालमत्तेच्या वादातून सावत्र आईचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने एकास दोषी ठरवले. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रवींद्र पांडुरंग माने (वय ४१, पळसंबे, ता. गगनबावडा) असे त्याचे नाव आहे. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. अमित महाडेश्‍वर यांनी काम पाहिले.
पळसंबे येथे प्रगती पांडुरंग माने (वय ६८) राहत होत्या. रवींद्र माने याच्या त्या सावत्र आई होत. दोघांत मालमत्तेच्या कारणावरून वाद होता. प्रगती माने या ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रापंचिक साहित्य घेऊन नातेवाइकांसह गेल्या होत्या. त्या पळसंबेतील घरात २१ जानेवारी २०१९ ला पुन्हा आल्या. याचा राग मनात धरून रवींद्रने पारळीने सावत्र आईवर हल्ला करून त्यांचा खून करून पोलिस ठाण्यात हजर होऊन फिर्याद दिली. गगनबावडा पोलिस ठाण्यात त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद झाला. याचा तपास तत्कालिन पोलिस निरीक्षक बी. डी. सूर्यवंशी यांनी केला.
खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक २) बी. डी. शेळके यांच्या न्यायालयात सुरू झाली. सरकार पक्षातर्फे ॲड. अमित महाडेश्‍वर यांनी १२ साक्षीदार तपासले. रवींद्रच्या फोनचे कॉल डिटेल्स्, त्यावरून त्याने घटनेदिवशी कुडित्रे, पळसंबे, साळवणपासून गगनबावडा पोलिस ठाण्यापर्यंत केलेला प्रवास, जप्त केलेले एस.टी. बसचे तिकीट, हत्यार, कपड्यावरील रक्ताचे डाग, त्याचे डीएनए पृथ्थकरण याबाबी युक्तिवादात मांडल्या. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर रवींद्रला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारपक्षाला ॲड. गजानन कोरे, ॲड. प्रशांत कांबळे, पैरवी अधिकारी पोलिस हवालदार सागर माने यांचे सहकार्य मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55335 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top