हाळोलीत सुक्ष्म आराखडा नियोजन बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हाळोलीत सुक्ष्म आराखडा नियोजन बैठक
हाळोलीत सुक्ष्म आराखडा नियोजन बैठक

हाळोलीत सुक्ष्म आराखडा नियोजन बैठक

sakal_logo
By

हाळोलीत सूक्ष्म आराखडा नियोजन बैठक
आजरा : हाळोली (ता. आजरा) येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सूक्ष्म आराखडा नियोजन बैठक झाली. तहसीलदार विकास अहिर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, राज्य प्रशिक्षण समन्वयकवरून पिसे, जिल्हा परिषद नोडल अधिकारी प्रफुल्ल कांबळे यांची मनोगते झाली. यावेळी हाळोली गावाशी संबंधित शासनाच्या सर्वच विभागाचे अधिकारी, नरेगा विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकरी, पॅनेल तांत्रिक अधिकारी डाटा एंट्री ऑपरेटर व पंचायत समितीकडील लिपीक उपस्थित होते. या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून दशवार्षिक सूक्ष्म आराखडा करणेबाबात अंतिमरीत्या नियोजन करण्यात आले. यामध्ये वैयक्तिक लाभाची कामे व सार्वजनिक कामाची स्थळपाहणी व शिवार फेरी करून आवश्यक त्या सर्व कामांचा समावेश दशवार्षिक आराखड्यामध्ये करण्यात येणार आहे. यावेळी गावातील पाणंद रस्ते, सार्वजनिक शाळा, शौचालय व अन्य कामांचा मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55338 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top