
१
मत-मतांतरे
---------
वीजसाक्षर व्हावे
वीजटंचाईवरील बातमी (‘सकाळ’ ः १२ एप्रिल) वाचली. आता वीजकपातीचे संकट येईल. सध्या उन्हाळा असून, प्रचंड उकाडा जाणवत आहे. राज्यात कोणतेही संकट असले तरी हाल मात्र सर्वसामान्यांचे होतात. खेडोपाडी तर ही कपात अधिक असून, दिवसरात्र वीज नसते. शहरातही तेच असते. इकडे मात्र वाढती विजेवरची वाहने विजेवर अवलंबून आहेत. रात्री खेळले जाणारे क्रीडा सामने, मेळावे, सभा यातून प्रचंड प्रमाणात वीज वापरली जाते. रात्रीच्या क्रीडा सामन्यांवर तर बंदीच हवी. काही शासकीय व निमशासकीय कार्यालये, मंगल कार्यालये, कार्यक्रमांचे हॉल यातही पंखे व ट्यूबलाइट अनावश्यक सुरू असतात. एक प्रकारे विजेची उधळपट्टी सुरू असते. प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून सर्व बाबतीत जागरूक राहिले पाहिजे. महापालिकेने रस्त्यावरील दिवे वेळेत बंद केले पाहिजेत. अशा तऱ्हेने वीजसाक्षर व्हावे व संकटाशी सामना करावा.
मंजिरी देवधर, सांगली
पर्यटनाला वाव
कोल्हापूर शहर व जिल्हा पर्यटनात देशात अग्रेसर आहे. धार्मिक, आर्थिक, सहकार, कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातही तो आघाडीवर दिसतो. पर्यटनामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. साहजिकच, स्थानिक रोजगारात वाढ झाली. पर्यटकांच्या पायाभूत सुविधांमध्ये योग्य ते बदल केले तर पर्यटनात आणखी वाढ होईल. सोयी-सुविधा, प्राथमिक गरजा, सोयीचा प्रवास मार्ग, दळणवळण यामुळे पर्यटन आणखी बहरेल.
प्रशांत शहापुरे, जयसिंगपूर (जि. कोल्हापूर)
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55342 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..