आजरा ः बळीराजा पतसंस्था बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः बळीराजा पतसंस्था बातमी
आजरा ः बळीराजा पतसंस्था बातमी

आजरा ः बळीराजा पतसंस्था बातमी

sakal_logo
By

बळीराजा पतसंस्थेला ३० लाखांवर नफा
आजरा ः पेरणोली (ता.आजरा) येथील बळीराजा कुरकुंदेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेला ३० लाख ७९ हजार १९७ रुपये ढोबळ नफा झाला. संस्थेचा कारभार पारदर्शक व काटेकोर सुरू आहे. सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांच्या जोरावर संस्थेची प्रगती सुरु असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी श्रीपतराव देसाई यांनी सांगितले. संस्थेकडे १० कोटी ३७ लाख ४०६ रुपयांच्या ठेवी आहेत. ८ कोटी ७९ हजार ३६५ रुपये शेअर्स भांडवल आहे. ७ कोटी ५८ लाख २८ हजार ५४२ रुपये कर्ज वाटप केले आहे. १३ कोटी २५ लाख ३९ हजार २६१ संस्थेचे खेळते भांडवल आहे.
यावेळी उपाध्यक्ष यशवंत धोंडीबा पाटील, संचालक इनास डुमिंग फर्नांडीस, पांडुरंग विठोबा गुरव, सुभाष दिनकर देसाई, यशवंत रावसाहेब देसाई, चंद्रकांत लक्ष्मण गुरव, दिनकर विष्णू कांबळे, वंदना पांडुरंग चव्हाण, सुजाता दिनकर कोडक आदी उपस्थित होते. संस्थेचे व्यवस्थापक सुरेश विष्णू कालेकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55343 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top