
सीपीआर
सीपीआर लोगो आवश्यक
-
सुपरस्पेशालिटी दर्जाची
सीपीआरला प्रतीक्षा
वैद्यकीय शिक्षण विभागाने लक्ष घालण्याची गरज
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः नियमित आजारांवरील उपचारासाठी सीपीआर रूग्णालय रूग्णांसाठी आधार ठरत आहे. मात्र, गंभीर आजारावरील उपचार व सेवा सुविधांची कमतरता आहे. परिणामी अनेक रूग्ण खासगी रूग्णालयात जाऊन जनआरोग्य योजनेचा लाभ घेत मोफत उपचार करून घेतात. त्यातून खासगी रूग्णालयाला वर्षाकाठी जवळपास ४० कोटींचा अर्थिक लाभ होतो. त्याच धर्तीवर सीपीआरमध्येही जनआरोग्य योजनेत कर्करोगासारख्या गंभीर दुर्धर आजारांची उपचार सेवा सुरू झाल्यास काही कोटींचा लाभ सीपीआरला होऊ शकतो. त्यातून सर्वसामान्यासाठी रूग्ण सेवा अधिक प्रभावी होऊ शकेल. त्यासाठी सीपीआरला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा दर्जाच्या सेवा सुविधा सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने मनावर घेऊन येथील उपचार सेवेतील कमतरता दूर करणे आवश्यक आहे.
कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा आदी भागातील रूग्ण उपचारासाठी कोल्हापूरात येतात. यातही सीपीआरच्या हृदयशस्त्रक्रिया विभाग, प्रसुती विभागात सर्वाधिक रूग्ण येतात तसेच अपघातातील सर्वच जखमीही सीपीआरला येतात, त्यांच्यावर तातडीने उपचार होतात. मात्र, डोक्याला मार बसला असेल, मणक्याची दुखपात अथवा झिज झाली असेल किंवा अन्य काही कारणाने एमआरआय काढावा लागतो. मात्र ही सुविधा सीपीआरमध्ये नाही. त्यामुळे जखमीला खासगी रूग्णालयात नेऊन एमआरआय काढावा लागतो. ही अडचण विचारात घेता सीपीआरला तातडीने एमआरआय मशिन नव्याने बसवावे लागेल.
रोज दोनशे ते चारशे रूग्ण पहिल्यांदा अपघात विभागात येतात. त्यांच्यासाठी दोनशे कक्ष उपचारासाठी आहेत. नवा कक्ष स्थापन केला. मात्र, तो कोरोनासाठी राखीव झाला. त्यानंतर जुन्याच अपघात विभागात सद्या उपचार सेवा दिली जाते. हा कक्षही पून्हा अद्यायावत करावा लागेल.
सीपीआरमध्ये रक्तपेढीची सुविधा आहे. येथे नियमित आजारातील रक्तांच्या चाचण्या होतात; पण बहुतांशी महत्वाच्या चाचण्या बाहेरच्या खासगी रक्तपेढीकडून करून घ्याव्या लागत आहेत, तर काही खासगी लॅबचे प्रतिनिधी सीपीआरच्या रूग्णांचे रक्ताचे नमुणे घेऊन चाचणी अहवाल देतात. ही पद्धत धोकादायक ठरू शकते. त्यासाठी रक्ताच्या सर्व तपासण्या सीपीआरमध्ये व्हाव्यात अशी सोय करावी लागेल.
चौकट
कर्करोगासाठी स्वतंत्र उपचार कक्ष हवा
कर्करोगीचे प्रमाण वाढते प्रमाण विचारत घेऊन सीपीआरमध्येच कर्करोग निदान व उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा लागेल. कर्करोगावर प्रभावी उपचार सेवा सीपीआरमध्ये नसल्याने बाहेर खासगी रूग्णालयात जातात. तेथे जनआरोग्य योजनेतून उपचार करून घेतात. जनआरोग्य योजनेची बिलांची वर्षाकाठी २० कोटींची रक्कम खासगी रूग्णालयाला जाते. हीच योजना सीपीआरमध्येही आहे. त्यामुळे कर्करोगाची प्रभावी उपचार कक्ष सीपीआर मध्ये सुरू झाल्यास तसेच चाचण्याची सुविधा सुरू झाल्यास योजनेतून रूग्णांवर मोफत उपचार होतील. त्यातून सीपीआरला कोट्यावधीची बिले योजनेतून मिळतील. त्यातून सीपीआरच्या उपचार सुविधा अधिक सक्षम करण्यास हातभार लागणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55349 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..