डीकेटीईचे स्नेहसंमेलन सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीकेटीईचे स्नेहसंमेलन सुरू
डीकेटीईचे स्नेहसंमेलन सुरू

डीकेटीईचे स्नेहसंमेलन सुरू

sakal_logo
By

19682, 19683,19684
इचलकरंजी ः ‘डीकेटीई’च्या स्नेहसंमेलनात पारंपरिक कलाविष्कार सादर करीत असताना विद्यार्थी-विद्यार्थिनी.

‘डीकेटीई’चे स्नेहसंमेलन सुरू
---
विद्यार्थ्यांत उत्साह; पारंपरिक वेशभूषेसह विविध कलाविष्कार
इचलकरंजी, ता. ५ ः दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘डीकेटीई’च्या स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली. त्यामुळे विद्यार्थी वर्गात उत्साह पाहावयास मिळाला. पहिल्या दिवशी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेचा कलाविष्कार सादर करीत लक्ष वेधले; तर ‘लढा स्वातंत्र्याचा’ हा कार्यक्रम ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत सादर करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या वेळी देशाला स्वातंत्र्य मिळविताना साक्षीदार असणारे भूपाल कागवाडे, डी. जी. कोरे, आप्पासो मणेरे, गणपतराव कांबळे, शामराव बत्ते, धोंडिराम कस्तुरे, शंकर निकम यांच्यासह संस्थेच्या सचिव डॉ. सपना आवाडे, संचालक डॉ. पी. व्ही. कडोले, स्वप्नील आवाडे, राहुल आवाडे उपस्थित होते.
‘डीकेटीई’चे स्नेहसंमेलन हे इचलकरंजीकरांच्या आकर्षणाचा विषय असतो. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले फॅशन शो, नृत्य आदी कार्यक्रमांचे दर्जेदारपणे सादरीकरण केले जाते. त्यामुळे हे कार्यक्रम सर्वांना खूप आवडतात. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा ५ ते ७ मे या कालावधीत डान्स शो, व्हरायटी शो, फोटोग्राफी, पुष्पांड अशा कार्यक्रमांबरोबरच विविध स्पर्धात्मक कार्यक्रम साजरे होणार आहेत. तसेच, ‘अंबर’ या नियतकालिकाचे प्रकाशनही होणार आहे.
आज स्नेहसंमेलनांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा केली होती; तर ‘लढा स्वातंत्र्याचा’ अंतर्गत स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सर्व वीरांचे स्मरण वेगवेगळ्या कलाकृतीतून करण्यात आले. प्रा. डॉ. ढंगे यांनी गायिलेल्या बंगाली भाषेतील पाच कडव्यांचे जन-गन-मन ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. झाशीची राणी, खुदीराम बोस, मदनलाल धिंग्रा यांचे विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आत्मकथन केले. वंदे मातरम् या गाण्यावर मैंदर्गी या अंध मुलीने केलेल्या भरतनाट्यम्‌ने तर कार्यक्रमाचा कळसच गाठला.
‘डीकेटीईचे’ संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रमांची तयारी सुरू असून, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ए. व्ही. शहा, ‘ट्रॅडिशनल’चे प्रमुख प्रा. एस. जी. कानिटकर, प्रा. पी. एस. जोशी, प्रा. एम. आर. रावळ, प्रा. पी. एन. गोरे, प्रा. व्ही. सी. साखरे आणि त्यांचे सहकारी हे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सुमोध दानोळे, माजी प्रमुख कृष्णा दायमा, मेधावी पाटील आदी विद्यार्थी सहकार्य करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55364 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top