प्रतिबिंब- संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिबिंब- संक्षिप्त
प्रतिबिंब- संक्षिप्त

प्रतिबिंब- संक्षिप्त

sakal_logo
By

१९६८१
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा गौरव
कोल्हापूरः महापालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे विद्यार्थी शिक्षक गुणगौरव कार्यक्रम झाला. शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या ५७ विद्यार्थ्यांसह चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव, शिक्षक महासंघाचे राजेंद्र कोरे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे राजेश वरक आदींचा सत्कार झाला. जरगनगर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वसंत आडके होते.
महापालिका शाळेतील महिला शिक्षकांनी हातकणंगले येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या महिला टीमचाही सत्कार झाला. संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर सावंत यांनी प्रास्ताविक केले. उमेश देसाई, सुभाष धादवड यांनी आभार मानले. संजय कडगावे, प्रकाश पाटील, संजय पाटील, मनोहर शिंदे, विजय जाधव, दिलीप माने, उत्तम कुंभार, सुनील पाटील, पर्यवेक्षिका उषा सरदेसाई, गीता काळे, नयना बडकस, किशोर शिणगारे, अजित पाटील, दिलीप देसाई, आनंदा पाटील, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
...
१९६६९
नेहरूनगर शाळेत नवीन दोन वर्ग
कोल्हापूर ः महापालिकेच्या नेहरूनगर शाळेत डी-मार्टच्या सौजन्याने दोन वर्ग खोल्यांमध्ये संगणक लॅब लायब्ररी उभारली आहे. त्यामुळे शाळेला नवीन दोन वर्गखोल्यांची गरज असून, पालकांच्या आर्थिक सहकार्यातून या खोल्यांच्या बांधकामाला नुकताच प्रारंभ झाला.
अरुण बारामते, सुधीर देसाई, शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, सुनील सदरे, मुख्याध्यापक शहाजी घोरपडे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. माजी नगरसेविका अश्विनी बारामते, महेश सावंत आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्तविक संजय पाटील यांनी केले. आभार अनिल शेलार यांनी मानले. अनिल साळोखे, रामदास वासकर, विठ्ठल दुर्गुळे व मच्छिंद्र बगाडे यांनी संयोजन केले.
...
१९६७०
शरण्या शिंदेचे यश
कोल्हापूर ः येथील महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स मराठी शाळेतील विद्यार्थिनी शरण्या प्रशांत शिंदे हिने समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. मुख्याध्यापक श्रद्धा कांबळे, स्वाती कांदळकर यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55374 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top