
टुडे संक्षिप्त
स्वामी नामस्मरण सोहळा रविवारी
कोल्हापूर : येथील स्वामी भक्त व सेवकांच्या वतीने रविवारी (ता. ८) नामस्मरण सोहळ्याचे आयोजन केले आहे. सलग पाचव्या वर्षी हा सोहळा होणार असून, पंचगंगा घाटावर सायंकाळी सहा वाजता पाच हजारहून अधिक स्वामीभक्त एकवटणार आहेत. पंचगंगेची आरती व नामस्मरणाच्या या आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन नामस्मरण सोहळा समितीने केले आहे. पत्रकार परिषदेला अरुण गवळी, गुरूदेव स्वामी, धनंजय महिंद्रकर, अमित पाटील, अभिजित पाटील, बाळासाहेब राऊत, प्रथमेश माळी, दिलीप बाला आदी उपस्थित होते.
...
१९६८७
मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा’
कोल्हापूर : मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबतचे निवेदन आज समस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे प्रशासनाला देण्यात आले. हिंदूंच्या सणावेळी स्पीकरच्या आवाजाची क्षमता मोजून लगेचच कारवाई केली जाते. मात्र, रोज सकाळी भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत कारवाई का होत नाही, असा सवाल निवेदनातून उपस्थित केला आहे. सेवा प्रतिष्ठानचे संभाजी साळुंखे, महाराज प्रतिष्ठानचे निरंजन शिंदे, प्रकाश सरनाईक आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
...
१९६८८
डॉ. सुनील पाटील यांना पुरस्कार
कोल्हापूर : गोवा येथील सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने येथील डॉ. सुनील पाटील यांना धन्वंतरी गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली ३७ वर्षे आंतरराष्ट्रीयस्तरावर आयुर्वेद प्रचार-प्रसार कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. रविवारी (ता.८) पणजी येथे पुरस्कार वितरण होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55375 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..