हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न खरीप हंगामपूर्व आढावा बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न
 हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न
खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

sakal_logo
By

19700

कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा
पालकमंत्री सतेज पाटील; खतांची टंचाई भासू नये यासाठी नियोजन करण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : कृषी विभागाच्या योजनांची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा. खरीप हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई भासू नये याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर ऑनलाईन सहभागी झाले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, ऊस उत्पादकता वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या. शेतकरी आणि त्यांच्या वारसांना अपघात विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा. गरज भासल्यास पोलिस अधीक्षक व संबंधित विभागांशी चर्चा करा. विकास सेवा संस्था आणि नाबार्डच्या वतीने कृषिपंपांना सौरऊर्जेवर विद्युतपुरवठा करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एखाद्या गावामध्ये पथदर्शी प्रकल्प राबवा. श्री. रेखावार, श्री. चव्हाण यांनीही माहिती दिली.
शेतकऱ्यांना पुरेशी खते, बियाणे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करा. विशेषत: युरिया व डीएपी रासायनिक खतांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात करा. मिश्र खत उत्पादनासाठीही शेतकऱ्यांना खतांचा पुरेसा पुरवठा करा, अशा सूचना आमदार आबिटकर, आमदार पाटील यांनी केल्या.

चौकट
नुकसानभरपाईचा आढावा
सध्या बियाणे मुबलक प्रमाणात असल्यामुळे बियाण्यांची अडचण येणार नाही, रासायनिक खतांची टंचाई भासू नये, यासाठी आवश्यक ते नियोजन करा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये ऊस पिकाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना देऊन २०२१ मधील पूर परिस्थितीचा, आतापर्यंत दिलेल्या नुकसानभरपाईचा आढावा ही पालकमंत्री पाटील यांनी घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55377 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top