
व्हाईट आर्मी- पंचगंगा मोहिम
१९६६८
व्हाईट आर्मीतर्फे
पंचगंगा घाटाची स्वच्छता
कोल्हापूर ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी महोत्सवानिमित्त महापालिका व विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीने शहरातील प्रेक्षणीय स्थळे, वारसा स्थळे, मुख्य रस्त्यांची स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जीवनमुक्ती सेवा संस्था, व्हाईट आर्मीच्या सलग तीन दिवस पंचगंगा घाट स्वच्छतेला प्रारंभ झाला आहे.
नदीमधील प्लास्टिक कचरा, पिशव्या, निर्माल्य आणि घाटावरील प्रवासी भाविकांकडून टाकलेला कचरा आज संकलित करण्यात आला. मोहिमेत व्हाईट आर्मीचे कार्यकर्ते सूरज साळोखे, सचिन भोसले, प्रशांत शेंडे, शंकर कैंगार, विनायक भाट, सौरभ पाटील, प्रवीण आमते, अखिलेश शेंडे, व्हाईट आर्मी स्कूलच्या शिक्षका माया सातपुते, संध्या मोरबाळे, दीपाली भोसले, संतोष कोळेकर, शिरीष मोरे, अर्चना कोळेकर, राजश्री ठाकरे, हमीदा देसाई, रामदास कांबळे, मर्जीन सय्यद आदींनी सहभाग घेतला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55386 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..