
जक्कूबाई शेतकरी आघाडीची शिवनगेच्या सेवा संस्थेत सत्ता
जक्कूबाई शेतकरी आघाडीची
शिवनगेच्या सेवा संस्थेत सत्ता
कोवाड, ता. ५ ः शिवनगे (ता. चंदगड) येथील दि. शिवनगे विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री जक्कूबाई शेतकरी विकास आघाडीने १२ पैकी १२ जागा जिंकून ग्रामदैवत श्री जक्कूबाई पॅनेलचा पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी टी. आर. खंदाळे यांनी निवडणूक निकाल जाहीर केल्यानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.
४१३ सभासदांपैकी ३६३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. १३ जागांपैकी १ जागा रिक्त राहिली, तर सर्वसाधारण महिला दोन, इतर मागास व अनुसूचित जाती जमातीची एक अशा ४ जागा श्री जक्कूबाई शेतकरी विकास आघाडीच्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. दोन्ही आघाड्यांकडून प्रचारात स्थानिक मुद्दे मतदारांच्या समोर आणून निवडणुकीत रंगत भरली होती. अखेर श्री जक्कूबाई शेतकरी विकास आघाडीने ८ पैकी ८ जागांवर विजय मिळवून संस्थेवर एकहाती सत्ता निर्माण केली. गोविंद प्रभू पाटील, राजकुमार रामचंद्र पाटील, भुजंग दत्तात्रय पाटील, तानाजी संतू पाटील, संभाजी सटूप्पा नांदवडेकर, दशरथ जक्कापा पाटील, जक्कापा कृष्णा नांदवडेकर, शिवाजी मायाणा मोरे आदी उमेदवार निवडून आले. तर, वंदना अमृत पाटील, कल्पना रमेश नाकाडी, वसंत रामू शिवनगेकर व ईराप्पा रामू कांबळे बिनविरोध निवडून आले. भटक्या विमुक्त जाती, जमातीचा दोन्ही आघाड्यांकडे उमेदवार नसल्याने ही जागा रिक्त राहिली. श्री जक्कूबाई शेतकरी विकास आघाडीच्या विजयासाठी प्रभाकर सांबरेकर, संभाजी पाटील, जोतिबा सांबरेकर, राजू प्रभाकर पाटील, चुडाप्पा मुंगारे, सुनील पाटील, ए. टी. पाटील, संगम पाटील, सुनील शिंदे, देवदास भालबर यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55399 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..