निम्म्या शहराला आज अपुरा पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निम्म्या शहराला आज अपुरा पाणीपुरवठा
निम्म्या शहराला आज अपुरा पाणीपुरवठा

निम्म्या शहराला आज अपुरा पाणीपुरवठा

sakal_logo
By

निम्म्या शहराला आज
अपुरा पाणीपुरवठा
बालिंगा केंद्रातील पंप नादुरुस्त
कोल्हापूर, ता. ५ : बालिंगा पाणी उपसा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या ए, बी, सी, डी तसेच ई वॉर्डमधील काही भागांना शुक्रवारी (ता. ६) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या केंद्रातील पंप गुरुवारी सायंकाळी नादुरुस्त झाला आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
या केंद्रावर अवलंबून ए, बी वॉर्ड, त्यास संलग्न उपनगरातील क्रशर चौक परिसर, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, टेंबे रोड परिसर, शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, अंबाबाई मंदिर परिसर, मिरजकर तिकटी परिसर, भारत डेअरी परिसर, महाद्वार रोड परिसर, मंगळवार पेठ भागात शुक्रवारचा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. सी, डी वॉर्डमधील दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवार पेठ तालीम, सिद्धार्थनगर, दसरा चौक, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, रविवार पेठ, उमा टॉकीज, गुजरी, देवल क्लब व ई वॉर्डातील खानविलकर पेट्रोल पंप, शाहूपुरी पाचवी ते आठवी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक या भागातही पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. शनिवारी (ता. ७ मे) पाणीपुरवठा सुरळीत होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55403 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top