वीज बिलातील पोकळ थकबाकी निकालात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज बिलातील पोकळ थकबाकी निकालात
वीज बिलातील पोकळ थकबाकी निकालात

वीज बिलातील पोकळ थकबाकी निकालात

sakal_logo
By

वीज बिलातील पोकळ थकबाकी निकालात
यंत्रमागधारकांना दिलासा; वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे महावितरणला पत्र
इचलकरंजी, ता. ५ ः तांत्रिक कारणांमुळे २७ एचपीवरील यंत्रमागधारकांच्या वीज बिलात आलेली दोन महिन्यांच्या थकबाकीचा प्रश्‍न निकालात निघाला आहे. याबाबत निर्माण झालेल्या गोंधळाबाबत वस्त्रोद्योग आयुक्तालयाकडून महावितरण कंपनीस लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. यामुळे संबंधित यंत्रमागधारकांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकी रद्द होणार आहे.
वस्त्रोद्योग धोरणानुसार ऑनलाईन नोंदणी न करणाऱ्या २७ अश्‍वशक्तीवरील यंत्रमागधारकांची वीज सवलत बंद करण्याचा निर्णय वस्त्रोद्योग विभागाने घेतला होता. या निर्णयामुळे यंत्रमागधारकांना दुप्पट दराने बिले भरावी लागणार होती. विविध अडचणींचा सामाना कराव्या लागणाऱ्या यंत्रमागधारकांसाठी हा मोठा धक्का होता. ही बिले भरणे यंत्रमागधारकांना अशक्य असल्याने त्यांनी वीज दराची सवलत पूर्ववत करण्यासाठी आंदोलनाचा लढा उभारला. अखेर फेब्रुवारी २०२२ मध्ये वीज बिलातील सवलत पूर्ववत करण्याचा निर्णय वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी घेतला.
या निर्णयानंतरही मार्चमधील बिलांमध्ये डिसेंबर आणि जानेवारीची सवलत बंद झाल्यामुळे पोकळ थकबाकी दिसत होती. पोकळ थकबाकी न भरण्यावर यंत्रमागधारक ठाम होते. मात्र, महावितरणला त्याबाबत कोणत्याही सूचना नव्हत्या. परिणामी, पोकळ थकबाकी वसुलीसाठी महावितरण आणि यंत्रमागधारक यांच्या संघर्षाची चिन्हे निर्माण झाली होती.
पोकळ थकबाकीतचा हा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी यंत्रमागधारक जागृती संघटनेचे विनय महाजन व राहुल खंजीरे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्यानंतर वस्त्रोद्योग आयुक्तालयाने याबाबतचे पत्र महावितरणला पाठविले आहे. त्यामध्ये सवलत बंद झालेल्या तारखेपासून सवलत पूर्ववत करण्यात आल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे दोन महिन्यांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकीचा प्रश्‍न निकालात निघाला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रमगाधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-------------
चौकट
इचलकरंजीत तब्बल ५२ कोटी पोकळ थकबाकी
इचलकरंजी शहरातील २७ एचपीवरील यंत्रमागधारांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकी सुमारे ५२ कोटींच्या घरात आहे. तर राज्यतील यंत्रमागधारकांची सुमारे १५० कोटी इतकी थकबाकी आहे. ही थकबाकी निकालात निघाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55422 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top