अपघातात कार चालकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातात कार चालकाचा मृत्यू
अपघातात कार चालकाचा मृत्यू

अपघातात कार चालकाचा मृत्यू

sakal_logo
By

१९७६०

सराफ व्यवसायिकाचा अपघाती मृत्यू
आयसोलेशन रिंगरोडवरील घटना; मोटारीचा ताबा सुटल्याने अपघात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः मोटारीचा ताबा सुटल्याने ती रुग्णालयाच्या शेडमध्ये घुसून झालेल्या अपघातात सराफ व्यवसायिकांचा मृत्यू झाला. अमित रमेश दड्डीकर (वय ३८, रा. विश्वकर्मा हौसिंग सोसायटी, नेहरूनगर) असे त्यांचे नाव आहे. आयसोलेशन रिंगरोडवर मध्यरात्री ही घटना घडली. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, अमित दड्डीकर हे सराफ व्यवसायिक आहेत. त्यांचे दैवज्ञ बोर्डींग परिसरात दुकान आहे. ते क्रिकेट खेळाडू होते. काल रात्री ते मोटारीतून कामानिमित्त बाहेर गेले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ते हॉकी स्टेडियम चौक ते शेंडा पार्क चौक मार्गे घरी जात होते. यावेळी त्यांचा मोटारीवरील ताबा सुटून मोटार एका खासगी रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीला धडकून ती येथील ऑक्सिजन शेडमध्ये घुसली. अपघातात दड्डीकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णावाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अपघातात मोटारीसह संरक्षक भिंतीसह शेडचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

उत्कृष्ट क्रिकेटपटू
सकाळ प्रायोजित ‘रोटरी प्रिमिअम लीग क्रिकेट स्पर्धेत’ ते पास्ट रोट्रॅक्ट युनाईटेड संघाकडून गेली सात वर्षे खेळत होते. त्यांनी स्पर्धेत अनेकदा सामनावीरचा बहुमानही मानही मिळवला होता. दुर्घटनेने चांगला खेळाडू गमावल्याची खंत क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त होत होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55424 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top