मनपा निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा निवडणूक
मनपा निवडणूक

मनपा निवडणूक

sakal_logo
By

आता लक्ष पुढील आदेशाकडे
---
निवडणूक आयोग, सरकारच्या कोर्टात चेंडू; पालिका प्रशासनाला प्रतीक्षा, इच्छुक अस्वस्थ
कोल्हापूर, ता. ५ ः सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याच्या दिलेल्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाचे राज्य निवडणूक आयोग, राज्य सरकार कोणते आदेश देते, याकडे लक्ष आहे. महापालिकेने बहुसदस्यीय प्रभागरचनेप्रमाणे त्रिसदस्यीय प्रभागरचना मंजुरीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. आता आयोग त्यावर निर्णय देते की आणखी काही निर्देश देते, यावर पुढील कार्यवाही ठरेल. यामुळे इच्छुकांमधील अस्वस्थता वाढली आहे.
१० मार्च २०२२ ला असलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या स्थितीपासून पुढील प्रक्रिया सुरू करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. महापालिकेने त्रिसदस्यीय प्रभागरचना पूर्ण करून अंतिम मंजुरीला पाठवली असताना राज्य सरकारने नवीन कायदा केला. अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांबाबत दिलेल्या निर्णयाने प्रक्रिया सुरू करण्याबाबत राज्य निवडणूक आयोग पुढील आदेश देऊ शकते. तसेच राज्य सरकारही काय भूमिका घेणार यावरही पुढील प्रक्रिया अवलंबून आहे. महापालिकेची प्रभागरचना मंजुरीच्या टप्प्यात असली तरी निवडणूक होणाऱ्या इतर महापालिकांचाही विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे आयोगाकडून सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल.
या निर्णयानंतर हद्दवाढीच्या चर्चेलाही सुरूवात झाली आहे. हद्दवाढ झाल्यास पुन्हा प्रभाग रचना करावी लागेल, त्यामध्ये बराच वेळ जाईल अशी चर्चा आहे. पण निवडणूक आयोगाकडे प्रभाग रचना मंजुरीला पाठवली असल्याने असा काही निर्णय घ्यायचा झाल्यास आयोगाला कळवावे लागणार असून, त्यांच्याकडून काय निर्देश येतात त्यावर पुढील कार्यवाही करावी लागेल, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे इच्छुकांच्या निवडणुकीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तातडीने निवडणूक व्हाव्यात, पण त्रिसदस्यीय प्रभागरचनेऐवजी एकसदस्यीय प्रभागरचनेप्रमाणे व्हाव्यात अशी इच्छा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.


चौकट
महिलांसाठी मिळणार ४५ प्रभाग
त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार ९२ सदस्यसंख्या झाली आहे. ३० प्रभागांत प्रत्येकी तीन सदस्य तर एका प्रभागात दोन सदस्य असतील. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १२ व एक अनुसूचित जमातीसाठी प्रभाग आरक्षित होऊ शकतो. ओबीसी आरक्षण नसल्यास उर्वरित ७९ प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहतील. महिला आरक्षण ५० टक्के असल्याने सर्वसाधारणमधील ३९ तर अनुसूचित जातीतील ६ असे सध्या तरी ४५ प्रभाग महिलांसाठी राखीव होऊ शकतात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55438 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top