चंद्रकांत पाटील प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील प्रेस
चंद्रकांत पाटील प्रेस

चंद्रकांत पाटील प्रेस

sakal_logo
By

‘भीमा कोरेगांव’वर आम्हीही बोलू शकतो
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ः शरद पवार यांच्यावर साधला निशाणा
कोल्हापूर, ता. ५ ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना स्वतःच्या घरावर झालेला हल्ला रोखता आला नाही; पण ते आता भीमा-कोरेगांव प्रकरणावर बोलत आहेत; पण आम्हालाही भीमा-कोरेगांव प्रकरणावर बोलता येते, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता लगावला. श्री. पाटील कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, ‘जातीजातीत भेद करणे, संघर्ष निर्माण करणे हा त्यांचा उद्योग आहे. भीमा कोरेगाव घडल्यानंतर पवार यांनी पत्रकार बैठकीत मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांची नांवे घेतली. म्हणजे प्रत्येक विषयात जातीचा रंग द्यायचा. आता संभाजी भिडे यांचेच नाव केसमधून काढावे लागले. त्यामुळे यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय. भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची पद्धत ठरलेली आहे.’
स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणावरून आता मराठा आणि ओबीसी समाजालाही श्री. पवार कळले असतील; पण मीच समाजाचा तारणहार आहे, असा आव आणत होते. त्यांनी भाजपचे नाव घेतलं तरी काय फरक पडत नाही. समाजाला सगळे माहिती आहे.’
ब्राह्मण मुख्यमंत्री व्हावा या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याबाबत श्री. पाटील म्हणाले, ‘श्री. दानवे कोणत्या पार्श्वभूमीवर बोलले हे माहिती नाही; पण भाजप-सेना युतीने मेरीटवर मुख्यमंत्रिपदाची निवड केली आहे. या राज्याने कधीही जातीच्या आधारावर मुख्यमंत्री ठरविले नाही. वसंतराव नाईक हे त्याचे मोठे उदाहरण आहे. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. म्हणून नव्हे तर मेरीटवर मुख्यमंत्री झाले आहेत.’
ओबीसी समाजासाठी दोन वर्षे हे सरकार मागासवर्ग आयोग नेमू शकलेले नाही. आयोग नेमायला काय तुम्हाला विरोधक लागतात का? आम्हाला आयोग नेमायाला विरोधक लागले नाहीत असे सांगून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याला होत असलेल्या विरोधावर राज व उत्तर प्रदेश सरकार बघून घेईल, अशी मोघम प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55443 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top