वडीलाचा खून चौघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडीलाचा खून चौघांना अटक
वडीलाचा खून चौघांना अटक

वडीलाचा खून चौघांना अटक

sakal_logo
By

१९७८५, ७८३, ७८२, ७८१


म्हालसवडेत व्यसनी पतीचा खून
निनावी पत्राद्वारे प्रकार उघड; मुलावर खुनाचा; पत्नीसह दोघांवर पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
सोनाळी, ता. ५ ः म्हालसवडे (ता. करवीर) येथे मुलाने दांडक्याने मारहाण करून व्यसनी वडिलांचा खून केला. भिकाजी आनंदा पाटील (वय ४७) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संशयित मुलावर खुनाचा तर पत्नीसह अन्य तिघांना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी अटक केली. मुलगा सुभाष भिकाजी पाटील (वय २३), त्याची पत्नी शारदा भिकाजी पाटील (४२), सर्जेराव बापू पाटील (३३) आणि हिंदूराव कृष्णात पाटील (५१, म्हालसवडे) अशी अटक केलेल्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, म्हालसवडे (ता. करवीर) येथे भिकाजी आनंदा पाटील कुटुंबासोबत राहत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. पाटील हे दारू पिऊन वरचेवर पत्नी संशयित शारदा आणि मुलगा सुभाषला त्रास देऊन भांडण करीत होते. पाटील यांच्या त्रासाला कंटाळून घरची मंडळी १२ एप्रिलला रात्री उशिरा येथील मंदिराजवळ गेली होती. पाटील मध्यरात्री तेथे गेले. त्यांनी त्यांच्या मुलीला ओढत घरी नेण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुभाषने लाकडी दांडक्याने मारले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार उघड होऊ नये यासाठी संशयित पत्नी शारदा, सर्जेराव आणि हिंदूराव यांनी संगनमत करून रक्ताचे डाग पाणी मारून धुऊन पुसून काढले. हा प्रकार कोणालाही न सांगता गावी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. लगेच दुसऱ्यादिवशी रक्षाविसर्जन करून पुरावा नष्ट केला.
दरम्यान, करवीर पोलिस ठाण्यात यासंबंधीचा निनावी अर्ज आला होता. त्याची चौकशी करताना हा प्रकार उघड झाला. त्यानुसार खून व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी चौघा संशयितांवर गुन्हा नोंद केला. न्यायालयाने त्या चौघांना ९ मे पर्यंत कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी गोकुल राज जी, सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे आणि अमलदार सुभाष सरवडेकर यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55457 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top