
कोल्हापुरातील आपत्ती व्यवस्थापनचे धडे इंग्लड मध्ये
आपत्ती व्यवस्थापनाचे
धडे मिळणार इंग्लंडमध्ये
---
डॉ. केविन यांची आज आपत्ती व्यवस्थापनला भेट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः कोल्हापुरातील आपत्ती व्यवस्थापनाचे धडे आता इंग्लंडमध्येही मिळणार आहेत. यासाठी इंग्लंडच्या टीसैड विद्यापीठाचे डॉ. केविन उद्या (ता. ६) कोल्हापूर दौऱ्यावर येतील. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागास भेट देणार आहेत. इंग्लंडच्या विद्यापीठात ‘एम.एस्सी. इन डिझास्टर मॅनेजमेंट’ हा अभ्याक्रम सुरू होत आहे. त्यासाठी डॉ. केविन कोल्हापुरात येत आहेत.
२०१९ च्या महापुराच्या काळात डॉ. केविन कोल्हापुरात आले होते. तेव्हा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली होती. तेथील काही स्वयंसेवी असलेल्या तरुणींनी बजावलेली सेवा पाहून ते थक्क झाले. त्यामुळेच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विषयावर इंग्लंडच्या विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अधिक माहिती घेण्यासाठी ते उद्या अभ्यास भेटी दौरा करणार आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांच्याबरोबर असतील. कोल्हापुरातील दोन विद्यापीठांशी ते करार करणार असून, येथील विद्यार्थ्यांना इंग्लंडमध्ये, तर तेथील काही विद्यार्थी कोल्हापुरातील विद्यापीठात शिक्षण घेता येईल काय, याची माहिती घेणार असल्याचे डॉ. संकपाळ यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55458 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..