ताल महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताल महोत्सव
ताल महोत्सव

ताल महोत्सव

sakal_logo
By

१९७७१


सुरेल स्वरसाजात महाताल महोत्सव
मामा खान यांचे गायन; लोक संगीताची नजाकत अवतरली शाहूनगरीत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः सारंगीचे सुरेल सुरावट, गिटारची धून, ढोलकचा ठेका, बासरीचे मंजुळ सूर अशा अस्सल लोकवाद्यांच्या तालासुरांत प्रसिद्ध गायक मामे खान यांच्या पहाडी स्वरसाज; तसेच पसिद्ध बासरी वादक राकेश चौरसिया यांच्‍या सुरेल बासरी वादनाने आज राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना वंदन केले. भारतीय संगीत परंपरेतील शेकडो लोकवाद्यांच्या बहारदार प्रदर्शनासोबत राजस्थानी लोकसंगीत व आधुनिक वाद्यांची ‘रॉक्स ॲण्ड रूटस’ मैफल रंगली. यातील नेटक्या सादरीकरणाने महाताल महोत्सवाचा पहिलाच दिवस गाजवला. रसिकांनी केलेल्या टाळ्या शिट्ट्यांच्या गजराने खासबाग मैदान घुमले. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत या महोत्सवाला आज सुरुवात झाली.
विशेष रंगमंचावर गायक मामे खान यांच्यासह वादकही राजस्थानी वेशभूषेत अवतरले. डोक्यास राजस्थानी मुंडासे, चंदेरी झब्बा, कानात डुल, पायात मोजड्या अशा वेशभूषेत आलाप, हरकतीची सुरेल सूर घेऊनच मामेखान यांनी राजस्थानी लोकगीतांचा सूर धरला. त्याला सारंगीची सुरेल साथ लाभली. क्षणाक्षणाला हायो...रे ... हायो रे चा तालही धरला. यानंतरच्या प्रत्येक गीतांत राजस्‍थानचे वाळवंट, उंट, खाद्य पदार्थ, राजवाडे अशा लोक जीवनांच्या विविध छटा दर्शवणारी गीते मामे खान यांनी सादर केली.
लोकसंगीतातील ताल सूर हा भारतीय बनावटीच्या वाद्यांनी अधिक सुरेल केल्याची प्रचितीही दिली. यात सारंगी व ढोलक अस्सल भारतीय लोक वाद्ये व इलेक्ट्रॉनिक्स गिटारच्या सुरावट यांची जुगल बंदीने तर या मैफलीचा कळसाध्याय केला. यानंतर दुसऱ्या सत्रात श्री. चौरसिया यांच्‍या बासरी वादनाने (फ्‍युजन) मैफील रंगत वाढविली.


दुर्मिळ खजाना
महोत्सवाला पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट दिली. ताल महोत्सवाच्या निमित्ताने दुर्मिळ होत असलेली, लुप्त झालेली तसेच सद्या वापरात असलेल्या २०० लोकवाद्यांचे प्रदर्शन केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आवारात भरले. यात आदिवासी लोककलावंतांनी लोकसंगीताचा जपलेला ठेवा पाहण्याची संधी आली आहे. प्रत्येक वाद्याचे सूर, ताल, नाद समजून घेण्यासाठी प्रदर्शनाला रसिकांनी भेट दिली. तेव्हा लोक कलावंतांनी वाद्ये वाजवत नृत्याचे फेरही धरले. या वाद्यांची सुरेलता दर्शवली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55468 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top