
पोलिसांचे आवाहान
चोरीप्रकरणी दोघांना अटक
इचलकरंजी : मोबाईल चोरी प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. दोन मोबाईल व मोटारसायकल असा ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कुणाल सुनील भोरे (वय २३ रा. भोनेमाळ) व निखिल शंकर पाटील (१९ कबनूर) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. १९ फेब्रुवारीला पावलू मोती सोज यांचा दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मोबाईल हिसडा मारुन नेला होता. या चोरीचा तपास सुरू असताना कुणाल भोरे व त्याचा साथीदार निखिल पाटील यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सोज यांचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार निखिल पाटील याच्याकडे चौकशी केली असता बंद घरातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. दोघांकडून ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलिस नाईक सागर चौगले, अमलदार सुनील बाईत, सतीश कुंभार, गजानन बरगालेल विजय माळवदे, प्रवीण कांबळे, अमित कांबळे, पवन गुरव यांच्या पथकाने केली.
शर्यती जिंकल्याच्या रागातून मारहाण
आजरा : बैलगाडी शर्यती प्रतिस्पर्धी जिंकत असल्याच्या रागातून तिघांना काठी व दगडाने मारहाण केली. बुधवार (ता. ४) आजरा-महागाव रस्त्यावर मेंढोलीनजीक हा प्रकार घडला. याबाबत आयाज दरवाजकर, मज्जीद दरवाजकर यांसह तीन अनोळखींविरोधात (आजरा) गुन्हा नोंद झाला. यामध्ये ओमकार पांडुरंग खवरे, रविराज प्रकाश देसाई व विशाल श्रीकांत कदम (सुलगाव, ता. आजरा) हे तिघे जखमी झाले आहेत. खवरे यांने फिर्यादीत म्हटले आहे, शर्यतीत आयाज व मज्जीद दरवाजकर पहिला नंबर येण्यासाठी चढाओढ करीत होते. दरम्यान, खवरे यांची गाडीही शर्यतीमध्ये होती. दरवाजकर यांची गाडी मागे पडल्यानंतर दोघांत वाद होऊन मारामारी झाली. दरवाजकर बंधूसह अन्य तिघांनी ओमकार, रविराज व विशाल यांना काठी व दगडाने मारहाण केली. आजरा पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
आठ चौकातील वाहतूक थांबणार
कोल्हापूर ः लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा स्मृतिशताब्दी दिन शुक्रवारी (६ मे) सर्वत्र कृतज्ञता दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी १० वाजता सर्वांनी १०० सेंकद स्तब्धपणे उभे राहून शाहू महाराजांना अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आता पोलिस प्रशासनही पुढे आले आहे. शहरातील सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, ताराराणी चौक, भगवा चौक, बिंदू चौक, सायबर चौक येथील वाहतूक १०० सेकंदांपर्यंत थांबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासर्व चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या एकाच वेळी प्रमुख सिग्नल रेड होतील. यामुळे वाहतूक जिथल्या तिथेच थांबणार आहे. यानंतर ही वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.
अपघातात वृद्धाचा मृत्यू
कोल्हापूर ः लिशा हॉटेल ते कदमवाडी रस्त्यावर झालेल्या मोपेड अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला. विलास गणपतराव पाटील (वय ६५, रा. कदमवाडी) असे त्यांचे नाव आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. बेशुद्धावस्थेत त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55477 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..