जिल्‍ह्यात अपघातात चौघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्‍ह्यात अपघातात चौघांचा मृत्यू
जिल्‍ह्यात अपघातात चौघांचा मृत्यू

जिल्‍ह्यात अपघातात चौघांचा मृत्यू

sakal_logo
By

जिल्‍ह्यात अपघातात चौघे ठार
---
मोटार अपघात; कोल्हापूरच्या सराफ व्यावसायिकाचा समावेश
कोल्हापूर, ता. ५ ः जिल्ह्यात आज वेगवेगळ्या तीन ठिकाणी झालेल्या अपघातात कोल्हापुरातील सराफ व्यावसायिक, आमजाई व्हरवडेतील महिला व दोन परप्रांतीय मजूर ठार झाले.
मोटारीचा ताबा सुटल्याने ती रुग्णालयाच्या शेडमध्ये घुसून सराफ व्यावसायिक अमित रमेश दड्डीकर (वय ३८, रा. विश्वकर्मा हौसिंग सोसायटी, नेहरूनगर) ठार झाले. आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथे मोटारीने धडक दिल्याने सुनीता दिनकर वाघवडे (वय ४५) ठार झाल्या. टाकळीवाडी येथील एका कारखान्यात पाण्याची टाकी कोसळून दोन परप्रांतीय कामगार ठार झाले. मंटूकुमार सिंह व कुंदेश्वर मिश्र अशी त्यांची नावे आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55489 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top