पत्रकांच्या खूप बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकांच्या खूप बातम्या
पत्रकांच्या खूप बातम्या

पत्रकांच्या खूप बातम्या

sakal_logo
By

१९८०७
कोल्हापूर : लहुजी संघर्ष सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना सदस्य.

लहुजी सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर : औरंगाबाद येथील मनोज आव्हाड हत्याप्रकरणी आणि राज्यातील मातंग समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबतचे निवेदन लहुजी संघर्ष सेनेतर्फे जिल्हाधिकारी यांना दिले. निवेदनातील माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील मनोज शेषराव आव्हाड या मातंग तरुणाची काही समाजकंटकांनी २० एप्रिल रोजी अमानुषपणे मारहाण करून निघृण हत्या केली. या मारहाणीचा व्हिडिओ क्लीप बनवून ती सोशल मीडियावर व्हायरल केली. हे प्रकरण जलदगती न्यायालयांत चालवून हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी तसेच सामाजिक न्याय विभागाकडून त्याच्या कुटुंबीयास मदत मिळावी व राज्यातील मातंग समाजावर होणारे अन्याय थांबवावेत; अन्यथा लहुजी संघर्ष सेनेच्या वतीने येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल. याप्रसंगी शहराध्यक्ष अमर तडाखे, करन सकटे, किरण मोरे, सम्राट कवाळे, अंकुश घाटगे, विशाल बिरांजे, कुमार दाभाडे.


शिंदे सरकार हायस्कूलमध्ये व्याख्यान
कोल्हापूर : तपोवन येथील शीलादेवी शिंदे सरकार हायस्कूलमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त विशेष व्याख्यान झाले. शाहीर राजू राऊत यांनी राजर्षींच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. सर्व मान्यवरांचे हस्ते राजर्षींच्या प्रतिमेचे पूजन केले. युवराज जाधव यांनी प्रास्ताविक केले. ऋजुता गुरव यांनी सूत्रसंचालन केले. सुनंदा जगदीश यांनी आभार मानले. मुख्याध्यापिका अनघा कशाळकर, सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


१९८०९
डॉ. रश्‍मी चव्हाण
१९८१० डॉ. महावीर चौगुले

डॉ. रश्मी चव्हाण अध्यक्षपदी
कोल्हापूर : भूलतज्ज्ञ संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली. अध्यक्षपदी डॉ. रश्मी चव्हाण, उपाध्यक्षपदी डॉ. शिवाजी जाधव, तर सचिवपदी डॉ. महावीर चौगुले यांची निवड झाली. संघटनेची सर्वसाधारण बैठक झाली. सचिव डॉ. विजय चव्हाण, कोषाध्यक्ष डॉ. विठ्ठल पाटील, प्रोग्राम सचिव डॉ. सुप्रिया कुलकर्णी, परिषद सचिव डॉ. पल्लवी कुलकर्णी, खजानीस डॉ. विठ्ठल पाटील, प्रॅक्टिशनर्स फोरम सचिव डॉ. शीतल देसाई, सीपीआरसी प्रोग्राम सचिव डॉ. प्रियांका वाघमारे, बुलेटिन सचिव डॉ. प्रकाश भरमगौडार. सदस्य असे : डॉ. उज्ज्वला ससे, डॉ. अनुपमा पटवर्धन, डॉ. अर्चिता पाटील, डॉ. मारुती पवार, डॉ. प्रदीप राऊत, डॉ. शुभांगी पवार. सल्लागार समिती डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. संदीप कदम, डॉ. कल्पना कुलकर्णी, डॉ. दिलीप देसाई. डॉ. शीतल देसाई जी. सी सदस्य (महाराष्ट्र राज्य) अशी निवड झाली. १६ ऑक्टोबर हा दिवस ‘भूलतज्ज्ञ दिवस’ म्हणून यावर्षी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा मनोदय व्यक्त केला. मावळते अध्यक्ष डॉ. जय मिराशी यांनी नवीन कार्यकरिणीचे स्वागत केले.


फिजिशियन असोसिएशनची वार्षिक परिषद
कोल्हापूर : जिल्ह्यातल सर्व फिजिशियनसाठी असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (एपीआय) कोल्हापूर शाखेची ‘केएपीआयसी २०२२’ ही वार्षिक परिषद घेतली. कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. राहुल दिवाण, उपाध्यक्ष डॉ. रूपाली कापले, सचिव डॉ. अमोल खोत, संयुक्त सचिव डॉ. विद्या पाटील, कोषाध्यक्ष डॉ. अभिजित गणपुले यांनी परिषदेबाबतची भूमिका सांगितली. पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरी सत्र घेतले. सायंकाळी व्याख्यानांचे आयोजन केले. रुग्णांमध्ये उद्‌भवणाऱ्या वेगवेगळ्या आजारांवर पुण्याचे डॉ. आनंद अलुरकर, डॉ. नितीन अभ्यंकर, डॉ. मनीष माळी, डॉ. मोहन मगदूम, डॉ. राजेश धोपेश्वरकर, डॉ. दिलीप कदम, डॉ. परिक्षित प्रयाग, मुंबईचे शीला मयात्रा, सांगलीचे डॉ. संदीप नेमानी, बेळगावच्या डॉ. पुर्णिमा पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉ. विनय थोरात यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन झाले. तसेच डॉ. थोरात यांनी डॉ. एस. के. कुलकर्णी यांचे स्मरणार्थ घेण्यात येणारे व्याख्यान दिले. जिल्ह्यातून तसेच पश्चिम महाराष्ट्रातून ३०० पेक्षा जास्त चिकित्सक उपस्थित होते.


फोटो : १९८१५
कोल्हापूर : कमला कॉलेजमधील कार्यशाळेत बोलताना प्रा. प्रशांत कल्लोळी.

कमला कॉलेजमध्ये कार्यशाळा
कोल्हापूर : कमला महाविद्यालयाच्या क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालय आणि माजी विद्यार्थिनी संघतर्फे ‘इफेक्टिव्ह इन्फॉर्मेशन सर्चिंग’ यावर कार्यशाळा झाली. भोगावती महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. प्रशांत कल्लोळी यांनी ऑनलाईन टिचिंग, लर्निंग, सोशल मीडिया’चा अभ्यासासाठी वापर, विपुल प्रमाणात उपलब्ध ऑनलाईन स्टडी मटेरियल, ईपीजी पाटशाळा, गुगल ट्रान्सलेटर, गुगल ॲलर्ट, हिस्टॉरिकल अर्काईव्ह या संशोधनासाठी उपयुक्त साईटस्‌ची माहिती सांगितली. प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर अध्यक्षस्थानी होत्या. माजी विद्यार्थिनी संघाच्या समन्वयक प्रा. डॉ. निता धुमाळ यांनी माजी विद्यार्थिनी संघ स्थापन करण्यामागील संस्थेचा उद्देश स्पष्ट केला. ग्रंथपाल प्रा. ऊर्मिला कदम यांनी परिचय केला. संयोजन प्रा. डॉ. छाया माळी, सौ. पूजा चव्हाण, प्रा. पूजा खोपकर यांनी केले. श्रीमती मनीषा कदम यांनी सूत्रसंचालन केले. माजी विद्यार्थिनी संघाच्या उपाध्यक्षा राजनंदा देशमुख, आजी व माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.


‘निधी आपके निकट’चे मंगळवारी आयोजन
कोल्हापूर : कर्मचारी भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालयातर्फे मंगळवारी (ता.१०) ‘निधी आपके निकट’ सकाळी ११ ते १२ तसेच ‘पेन्शन अदालत’चे आयोजन सकाळी १२ ते दुपारी एक वेळेत ताराबाई पार्क येथील कार्यालयात करण्यात येणार आहे, तरी या संदर्भात ज्या सभासदांच्या काही तक्रारी, अडचणी किंवा कागदपत्रांची पूर्तता करणेबाबत काही प्रश्न असतील तर त्यांनी आपले अर्ज स्वतःच्या सहीनिशी ro.kolhapur@epfindia.gov.in या ई-मेलवर ९ मे पर्यंत सायंकाळी चारपर्यंत मेल स्वरूपात करावेत. ई-मेलमध्ये सभासदांनी पिपिओ नंबर तसेच प्रॉव्हिडंट फंड नंबरचा स्पष्ट उल्लेख करावा. तसेच आपणास या संदर्भाची लिंक पाठवण्यासाठी आपला ई-मेल किंवा Whatsapp नंबर अर्जात नमूद करणे आवश्यक आहे, अशी माहिती आयुक्त अमित चौगुले यांनी पत्रकाद्वारे दिली.


19821
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य फेसकॉमतर्फे प्रशस्तीपत्र स्वीकारताना राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे उपाध्यक्ष अंजुमन खान आणि अतिरिक्त कोषागार अण्णासाहेब दानोळे यांच्या हस्ते अध्यक्ष डी. एस. घोलराखे, उपाध्यक्ष के. बी. गुरव, संचालक कावजी कदम, आर. डी. कांबळे, दिलीप जोशी, कोषागार आर. डी. नार्वेकर, प्राचार्य व्ही. डी. माने, प्रमोद गिरी, श्री. साळोखे, शोभा पोर्लेकर, श्री. आडिवरेकर, श्री. नलवडे, श्री शहा उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55505 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top