
चंदगडला सर्व स्तरातून आदराने अभिवादन
19827
पार्ले ः केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनोखी साखळी तयार करुन राजर्षी शाहूंना अभिवादन केले.
19829
चंदगड ः सर्वोदय वाचनालयात शाहूंना अभिवादन करताना अध्यक्षा प्राची काणेकर, शिवानंद हुंबरवाडी, एस. व्ही. गुरबे आदी.
चंदगडला सर्व स्तरातून
आदराने अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ६ ः लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज तालुक्यात सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. विविध जाती, धर्मातील अबालवृध्दांनी अतिव आदराने १०० मिनीटे स्तब्ध राहून त्यांच्या कार्याचे स्मरण करीत कृतज्ञता व्यक्त केली.
येथील नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्या हस्ते शाहूंच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर शंभर मिनीटे स्तब्ध राहून अभिवादन करण्यात आले. नगरसेवक सचिन नेसरीकर, आनंद हळदणकर, नेत्रदीपा कांबळे, अनिता परीट, अनुसया दाणी, प्रमिला गावडे, संजना कोकरेकर, दिलीप चंदगडकर, प्रशासकीय अधिकारी आशुतोष कांबळे, श्रीराम ढाके, दत्तात्रय टोपे, अमोल पाटील, प्रमोद पाटील, संतोष कडूकर, राजू शिंदे, अनंत चंदगडकर, आकाश पोवार, उत्तम हळदणकर, किरण कांबळे, प्रिती बल्लाळ, वसंत कोलकार, संतू खांडेकर, राजू दळवी, प्रमोद कांबळे, सलीम मदार, स्वप्नील हजगुळकर, विश्वजित पोवार उपस्थित होते.
सर्वोदय वाचनालय ः निवृत्त प्राचार्य एस. व्ही. गुरबे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्य कर्तृत्वाबदद्ल माहिती दिली. शेती, शिक्षण, सहकार, उद्योग आदी सर्वच क्षेत्रात शाहू महाराजांनी घेतलेले निर्णय द्रष्टेपणाचे होते असे मत मांडले. वाचनालयाच्या अध्यक्षा प्राची काणेकर, संचालक शिवानंद हुंबरवाडी, सचिन नेसरीकर, दीलीप चंदगडकर, विशाल कामत, विवेक सबनीस, नेत्रदीपा कांबळे, अनिता परीट, महादेव कुंभार, श्रीकृष्ण दाणी उपस्थित होते. ग्रंथपाल समीर शेलार यांनी आभार मानले.
माडखोलर महाविद्यालय ः येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील यांचे शाहू महाराजांच्या कार्याबद्दल माहिती देणारे व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शंभर व्याख्याने शंभर ठिकाणी या स्वरुपानुसार हा कार्यक्रम झाला. संस्थेचे अध्यक्ष अॅड. एस. आर. पाटील, प्रा. एस. पी. बांदिवडेकर, एम. एम. तुपारे, प्रा. एन. एस. पाटील, प्रा. आर. पी. पाटील, प्रा. एस. व्ही. गुरबे उपस्थित होते. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. के. सावंत यांनी आभार मानले.
हलकर्णी ः येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे १०० सेकंद स्तब्धता पाळून विनम्र अभिवादन करण्यात आले. प्राचार्य पी. ए. पाटील, डॉ. राजेश घोरपडे, डॉ. चंद्रकांत पोतदार, डॉ. जे. जे. व्हटकर, प्रा. जी. जे. गावडे, प्रा. एम. एस. तायडे, पूजा सुभेदार, अविनाश पाटील, प्रमोद पाटील, पांडुरंग चव्हाण यांच्यासह नागरीक सहभागी झाले होते.
पार्ले ः केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी १०० हा अंक दर्शवणारी अनोखी साखळी रचून शंभर सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, अंगणावाडी सेविका, मदतनीस यांच्यासह विद्यार्थी, स्थानिक नागरीक उपस्थित होते.
अडकूर ः ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच यशोदा कांबळे, उपसरपंच अनिल कांबळे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर सर्व सदस्य, नागरीकांच्या उपस्थितीत १०० मिनीटे स्तब्धता पाळून अभिवादन करण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55543 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..