गड-घाळी महाविद्यालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-घाळी महाविद्यालय
गड-घाळी महाविद्यालय

गड-घाळी महाविद्यालय

sakal_logo
By

19839
गडहिंग्लज : घाळी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना प्रा. शशिकांत बोराळकर.


घाळी महाविद्यालयात
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, स्पर्धा परीक्षा विभाग व एम. एन. कोल्हापूरे ग्रंथालयातर्फे व युनिक अॅकॅडमीच्या (कोल्हापूर) सहकार्याने पदवीचा अभ्यास करतानाच विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याबाबतचा मार्गदर्शन कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र सावेकर यांनी स्वागत केले. युनिक अॅकॅडमीचे संचालक प्रा. शशिकांत बोराळकर यांनी यूपीएससी परीक्षा, त्याची तयारी व स्वरूप या विषयी तर प्रा. हेमंत जोशी यांनी सोप्या आणि ग्रामीण भाषेत अर्थशास्त्राचा अभ्यास कसा करावा, राज्यसेवा (पूर्व, मुख्य व मुलाखत) याचे विवेचन केले. प्रा. रंगराम मोकाळी यांनी दुय्यम सेवा परीक्षा गट ब आणि क व पीएसआय, एसटीआय, एएसओ या परीक्षेची तयारी कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले. उपप्राचार्य प्रा. ए. बी. उंदरे, डॉ. एन बी. मासाळ, प्रा. महेश व्हंडकर, प्रा. प्रवीण दावणे, डॉ. वाघमारे, प्रा. विकास अतिग्रे, प्रा. ए. जी. गोडघाटे, डॉ. किरण पाटील, डॉ. सरोज बीडकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55551 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top