दुगुनवाडी-बसर्गेत कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुगुनवाडी-बसर्गेत कार्यशाळा
दुगुनवाडी-बसर्गेत कार्यशाळा

दुगुनवाडी-बसर्गेत कार्यशाळा

sakal_logo
By

बसर्गेत स्वसंरक्षण कार्यशाळा उत्साहात
दुगूनवाडी : बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील श्रीमंत बाबासाहेब नाडगोंडे मेमोरियल ट्रस्ट व बसर्गे एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थिनी, युवती व महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा उत्साहात झाली. एस. एम. हायस्कूलमध्ये ही कार्यशाळा झाली. प्रमुख मार्गदर्शिका श्रुती पुगांवकर, त्रिवेणी पुंगावकर, चैत्राली कालेकर, आदित्य परीट आदींनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. मुलींसाठी आहार, व्यायाम, आरोग्य, संस्कार याविषयी मार्गदर्शन केले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत वर्षादेवी नाडगोंडे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी गावातील ७० मुली, युवती व महिलांनी सहभाग घेतला होता. मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर यांनी स्वागत केले. सचिव आर. बी. टेळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55567 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top