नूल-मुगळी कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नूल-मुगळी कार्यक्रम
नूल-मुगळी कार्यक्रम

नूल-मुगळी कार्यक्रम

sakal_logo
By

19869
मुगळी : लक्ष्मी मंदिरात महाकुंकूमार्चन पुजेत सहभागी झालेल्या महिला.

मुगळीत महाकुंकूमार्चन सोहळा
नूल : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामदैवत श्री सोमलिग मंदिराची वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहन लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या अंतर्गत महाकुंकूमार्चन सोहळा उत्साहात झाला. या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचा आजचा तिसरा दिवस होता. गावातील सुवाशींनीच्या उपस्थितीत कुंभ मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर 1008 सुवासिनींची ओठी भरणी, श्रीयंत्र पुजा व महाकुंकूमार्चन कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम लक्ष्मी मंदीरात झाला. श्री गुरुसिध्देश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते पुजा होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. मारुती भोरे, सुरज भोरे, प्रदिप गुरव यांनी सुवासिनी महिलांकडुन श्री महालक्ष्मी श्रीयंत्रावर महाकुंकूमार्चन पुजा करुन घेतली. सोमलिंग मंदिरात रूद्रहोम व हवन झाले. यावेळी सोमगोंडा आरबोळे, जिर्णोव्दार समितीचे अध्यक्ष रमेश आरबोळे, बाळगोंडा पाटील, अशोक महाडिक, रायगोंडा पाटील, आप्पासाहेब जाधव, गजानन पाटील, दुंडापा पाटील, श्रावण आरबोळे, सागर आरबोळे, अरुण आरबोळे, रमेश पाटील, विक्रम शिंदे, के. एन. पाटील, निजगुणी स्वामी, भिमा आरबोळे, आप्पासाहेब धूळाज, विवेक स्वामी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55570 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top