
-
जैन बोर्डिंगमध्ये उद्या
बिझनेस स्टार्टअप कार्यशाळा
दानोळी ः वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वीर सेवा दल प्रांतिय, जिल्हा व तालुका समिती आणि व सिबीक बिझनेस इनक्युबेर, कोल्हापूर यांच्यातर्फे नवउद्योजकांसाठी बिझनेस स्टार्टअप कार्यशाळा रविवारी (ता. ८) सकाळी नऊपासून सायंकाळी पाचपर्यंत कोल्हापूर येथील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये होणार आहे. दोन सत्रांत होणाऱ्या कार्यशाळेत शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे हे ‘स्कोप ऑफ बिझनेस अॅण्ड बिझनेस अपॉर्च्युनिटी’ या विषयावर, तर दीपक पाटील हे ‘करो, आगे बढो, या वही रहो’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात ‘सिबीक बिझनेस इनक्युबेर’चे सूर्यकांत दोडमिसे हे ‘स्टार्टअप इको सिस्टिम अॅण्ड फंड राइसिंग’ या विषयावर, तर सचिन कुंभोजे हे ‘हाऊ टू प्रीपेअर बिझनेस मुडल’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर यशस्वी उद्योजक व व्यावसायकांची मुलाखत होईल.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55603 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..