हातकणंगले, शिरोळ तालुक्यात राजर्षींना आदरांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हातकणंगले, शिरोळ तालुक्यात राजर्षींना आदरांजली
हातकणंगले, शिरोळ तालुक्यात राजर्षींना आदरांजली

हातकणंगले, शिरोळ तालुक्यात राजर्षींना आदरांजली

sakal_logo
By

06660
शेतातूनच वाहिली आंदराजली
भादोले : येथे जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांच्या शेतामध्ये आंतर मशागत सुरू असताना शेतमजुरांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त शेतातच १०० सेकंद उभे राहून मानवंदना दिली.
-----------
03049
जयसिंगपूर : छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करताना मान्यवर.

शाहूंना जयसिंगपूरकरांचे वंदन
जयसिंगपूर : नगरीचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी कृतज्ञतापर्व निमित्त शहरातील क्रांती चौकात १०० सेकंद स्तब्धता पाळून त्यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या वेळी माजी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, स्वरूपा पाटील यड्रावकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, माजी नगरसेवक पराग पाटील, बजरंग खामकर, उद्योगपती विनोद घोडावत, सर्जेराव पवार, महेश कलगुटगी, शीतल गतारे, राजेंद्र झेले, राजेंद्र नांद्रेकर, संभाजी मोरे, मिलिंद शिंदे, चंद्रकांत जाधव घुणकीकर, सागर मादनाईक, अमरसिंह निकम, सुभाष भोजणे, राजेंद्र आडके, अर्जुन देशमुख, बबन यादव, चंद्रकांत झेले, बंडा मिनीयार, बाळासाहेब वगरे, स्वाती भापकर, मिलिंद भिडे, रमेश यळगुडकर, राजेंद्र दाईंगडे, अॅड. भाग्यश्री जोशी, अर्चना भोजणे, मयूरी पाटील, पद्मश्री नटवे, माधुरी चौगुले, विद्यार्थी, संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्राजक्ता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
----------------
01229
माणगाव : येथे समता फेरीमध्ये विविध धर्मियांनी सहभाग घेतला.

माणगावमध्ये समता फेरी
रुकडी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त ऐतिहासिक माणगावमध्ये (ता. हातकणंगले) विविध धर्माचे नागरिकांनी व प्रमुख कार्यकर्त्यांनी शंभर सेकंद स्तब्धता पाळून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले. गावामधून राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिवीर आप्पासाहेब पाटील यांच्या प्रतिमा असलेल्या चित्ररथासह समता फेरी काढून महापुरुषांचा जयघोष करण्यात आला. या वेळी मुरलीधर कांबळे, झाकीर हुसेन भालदार, नितीन कांबळे, नंदकुमार शिंगे, शौकत भालदार, शिवाजी वडर, प्रा. किसन गवळी, सुंदर कांबळे, राहुल कांबळे, शशिकला माणगावकर, बताश कामत, प्रवीण कांबळे, बाळासो शिंगे, शशिकांत कांबळे, सुनील चव्हाण, नजीर जमादार, अनिल येवारे, राजू जमादार, सचिन बोरगावे, बद्रुद्दिन नदाफ, इलियास तहसीलदार, निहाल जमादार, दिलदार मोकाशी, जमीर पठाण, राजू बारगिर, फारूक नदाफ, मलिक नदाफ, दिलदार मोकाशी, अमीर जमादार,फय्यूम म्हालदार, शाहनवाज जमादार, अनिस भालदार, मुझफ्फर भालदार, अल्फाज भालदार, कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------
हातकणंगलेत अभिवादन
हातकणंगले ः येथे सकाळी दहा वाजता शंभर सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. दरम्यान, दहा मिनिटे अगोदर सांगली-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. या वेळी तहसीलदार कल्पना ढवळे, नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर, पोलिस निरीक्षक के. एन्. पाटील, भूमि अभिलेख उपअधीक्षक सुवर्णा मसणे, नायब तहसीलदार दिगंबर सानप, प्रमोद गायकवाड, दुय्यम निबंधक राजेंद्र भानसे, सोनाली उद्योग समूहाचे संदीप कारंडे, भाऊसो फास्के, दयासागर मोरे, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी प्रा. रवींद्र पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती सांगितली. येथील डॉ. सुजित मिणचेकर जनसंपर्क कार्यालयामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून १०० सेंकद स्तब्ध उभे राहून अभिवादन करण्यात आले. या वेळी डॉ. मिणचेकर, पिंटू मुरूमकर, आण्णासो जाधव, आप्पासाहेब मोहिते, संजय चौगुले, राजू जगदाळे, धोंडिराम कोरवी, ॲड. संग्रामसिंह निंबाळकर, अनिल कदम, प्रकाश कांबळे, दादा अपराज, किसन तिरपणकर, सचिन इंगळे, ॲड. चिंतामणी कांबळे, सुखमार काळे, अजय कांबळे, शशिकांत मिणचेकर, काकासो पाटील, श्रीकांत पाटील, देवाशिस भोजे, धीरज भोजकर, संदीप कांबळे, संतोष कांबळे, प्रशांत सुतार, विद्याधर खोत, रणजित मोरे, ओंकार लाखन, प्रशांत कांबळे, विवेक नागावकर, केदार नाईक उपस्थित होते.
------------
रुकडी परिसर
रुकडी : येथे ग्रामपंचायत, शिवाजी चौक, विविध पतसंस्था, सामाजिक संस्था, तरुण मंडळे, समाज मंदिरे, शाळा, महाविद्यालय, व्यापाऱ्यांतर्फे शंभर सेकंद स्तब्धता पाळून राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
-----------
01730
हुपरी : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना शंभर सेकंद स्तब्धता पाळून कृतज्ञता व्यक्त प्रसंगी मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार, नगरसेवक जयकुमार माळगे किरण कांबळे आदी.

हुपरी परिसर
हुपरी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शहर व परिसरात शंभर सेकंद स्तब्धता पाळून शाहू महाराजांना वंदन करण्यात आले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात झालेल्या कृतज्ञता सोहळ्याला मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार, नगरसेवक जयकुमार माळगे, आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील, माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे, विद्याधर कांबळे, डॉ. सुभाष मधाळे, आनंदराव कांबळे, संतोष नरंदेकर, डॉ. स्वप्‍नील हुपरीकर, बच्चू हुपरीकर उपस्थित होते. जवाहर कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. पोलीस ठाण्यात ज्‍येष्ठ नागरिक संघाच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराज यांना वंदन केले. सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यळगूड ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सुनीता हजारे व सदस्य, नागरिक यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहिली. राष्ट्रवादीतर्फे जुने बस स्थानक परिसरात मुख्य रस्त्यावर स्तब्धता पाळून अभिवादन केले. बाहुबली गाट, पृथ्वीराज गायकवाड, संकेत कानडे, सुनील गाट, अरविंद खेमलापूरे, राजेंद्र पाटील, अजित किणीकर आदी उपस्थित होते.
------------
शिबिराची सांगता अभिवादनाने
दानोळी ः येथील कुमार विद्यामंदिर शाळा नं २ शाळेत तीन दिवस उन्हाळी शिबिर आयोजित केले होते. याची सांगता राजर्षी शाहूंना अभिवादन करून झाली. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेवराव धनवडे यांचे हस्ते शाहू महाराजांच्या फोटोचे पूजन झाले. सरपंच सुनीता वाळकुंजे यांच्या हस्ते जातीचे दाखले वाटप करण्यात आले. प्रज्ञाशोध परीक्षेत तालुकास्तरीय यशस्वी विद्यार्थ्यांचे व समृद्धी टॅलेंट सर्च परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. या वेळी महादेवराव धनवडे, शरद साखरचे संचालक रावसाहेब भिलवडे, सदस्य दादा खोत, प्रकाश पाटील, रोहित धनवडे, शोभा पिंटू गावडे, मंगल दळवी, बोरचाटे, उमेश केकले, रावसाहेब पाटील, नितीन लंबे, अशोक लंबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभय वाळकुंजे, सदस्य, मुख्याध्यापक अरविंद मजलेकर उपस्थित होते. विजय भोसले यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.
---------------
शाहूंचे कार्य संस्थान पुरते मर्यादित नाही ः पाटील
कुरुंदवाड ः छत्रपती शाहू महाराजांचे समग्र कार्य फक्त कोल्हापूर संस्थान पुरते मर्यादित नव्हते तर ते राष्ट्रव्यापी होते, असे प्रतिपादन येथील माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी केले. राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला येथील नगरपरिषद चौकात आज सकाळी दहा वाजता पुष्पहार घालून शहरातील नागरिकांतर्फे शंभर सेकंद स्तब्धता पाळण्यात आली. या वेळी पाटील बोलत होते. माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, माहेश्‍वरी हावळे, पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, बाबासो नदाफ यांनी मनोगते व्यक्त केली. वैभव उगळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी पोलिस उपनिरीक्षक पाटील व तितिक्षा कांबळे यांचा सत्कार झाला. जमीर पठाण यांनी सूत्रसंचालन केले. राजू आवळे यांनी आभार मानले. विजय पाटील, तानाजी आलासे, बाबासाहेब सावगावे, अक्षय आलासे, सुनील कुरुंदवाडे, महिपती बाबर, अभिजित पाटील, वैशाली जुगळे, बाबासाहेब भुजुगडे, विजय कुलकर्णी, सहदेव केंगाळे, धनंजय काळे, शरद आलासे, प्रा. बी. डी. सावगावे, फारूक जमादार, रणजीत डांगे, उदय डांगे, अभय पाटूकले, जय कडाळे, अरुण आलासे, आयुब पट्टेकरी, सुनील कुरुंदवाडे, दुंडय्या स्वामी, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले.
-------------
कबनूर चौकात स्तब्धता
कबनूर ः येथील मुख्य चौकात स्तब्धता पाळून राजर्षी शाहूंना अभिवादन करण्यात आले. सरपंच शोभा पोवार उपसरपंच, सुधीर पाटील, ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग, मंडलाधिकारी जे. आर. गोन्साल्विस, तलाठी एस. डी. पाटील, संस्थांचे पदाधिकारी, सहभागी झाले. तत्पूर्वी ग्रामपंचायत सभाग्रहात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, अशोक पाटील यांच्याहस्ते झाले.
---------
कुंभोजसह परिसर
कुंभोज : कुंभोजसह परिसरात राजर्षी शाहू महाराजांना आदराजंली वाहण्यात आली. सकाळी ग्रामपंचायत कार्यालय, गावचावडी, आरोग्य उपकेंद्र, न्यू इग्लिश स्कूल, गर्ल्स हायस्कूल, केंद्रीय प्राथमिक शाळा, कन्या शाळा, ऊर्दू शाळा, आश्रम शाळा, कर्मवीर फाउंडेशन, समस्त बौद्ध समाज, दुर्गेवाडी ग्रामपंचायत, दुर्गेवाडी शाळा, बाहुबली येथील एम. जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बालविकास विद्यामंदिर, नरंदे येथील ग्रामपंचायत, ब्रिलियंट स्कूल, हिंगणगाव ग्रामपंचायत आदी ठिकाणी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
---------------
खोचीत विविध उपक्रमातून अभिवादन
खोची : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रांगणात १०० सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहिली. तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शाहूमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायततर्फे पंधराव्या वित्त आयोग निधीमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नानिवळे धरणग्रस्त वसाहत शाळा तसेच अंगणवाडी यांना एलएफडी टीव्ही संच, शालेय क्रीडा साहित्य यांचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक कुटुंबासाठी कचरा साठवण्यासाठी बकेट वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच जगदीश पाटील, उपसरपंच रोहिणी पाटील, ग्रामविकास अधिकारी आर. एस. मगदूम, सदस्य सुहास गुरव, अभिजित चव्हाण, प्रमोद सूर्यवंशी, राजकुमार पाटील, प्रमोद गुरव, स्नेहा पाटील, पूनम गुरव, शोभाताई पाटील, कमल ढाले, डॉ. रोजा आवळे, ए. एल. आगाशे, शुभांगी आयवळे, सचिन पाटील, विकी कुरणे, माणिक ढाले, विष्णू पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, उपस्थित होते. महावीर मगदूम यांनी स्वागत केले. नितीन जाधव यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55634 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top