कोवाड- शाहू जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड- शाहू जयंती साजरी
कोवाड- शाहू जयंती साजरी

कोवाड- शाहू जयंती साजरी

sakal_logo
By

कोवाडसह परिसरात
विविध ठिकाणी अभिवादन
कोवाड, ता. ६ ः कोवाड परिसरात विविध ठिकाणी आज लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना १०० सेंकद स्तब्ध राहून अभिवादन करण्यात आले. शाहू महाराजांच्या स्मृतीना अभिवादन करण्यासाठी शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, ग्रामपंचायत, सहकारी संस्था, मंडळे यांच्यासह व्यापारी व कर्मचारी संघटना सहभागी झाल्या.
येथील श्रीराम विद्यालयात प्राचार्य एस. एन. पाटील यांनी प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केले. या वेळी उपप्राचार्य प्रा. एस. टी. कदम व प्रा. के. एन. तेऊरवाडकर यांनी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली. या वेळी प्रा. एम. बी. नाईक, डी. आर. धर्माधिकारी, प्रा. एस. एम. माने, रामा व्हन्याळकर, भिमा तरवाळ उपस्थित होते. दुर्गामाता चौकात जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण व सरपंच अनिता भोगण यांच्या उपस्थितीत सर्व व्यापाऱ्यांनी अभिवादन केले. ग्रामपंचायतीत उपसरपंच पुंडलिक जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. या वेळी रामचंद्र व्हन्याळकर, दिपक वांद्रे, चंद्रकांत सुतार, आप्पा जाधव, सुवर्णा पाटील, रेश्मा वांद्रे, रंजना पाटील, सुवर्णा कुंभार, नुसरत मुल्ला उपस्थित होत्या. कला महाविद्यालयात क्रीडा विभाग व एन. एस. एस. विभागातर्फे अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. डॉ. के. एस. काळे यांनी स्वागत केले. प्रा. आर. टी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डी. जी. काफुरे यांनी मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये मुख्याध्यापक श्रीकांत सुळेभावकर यांनी प्रतिमा पुजन केले. डॉ. अर्चना पाटील, व्ही. आर. पाटील उपस्थित होते. रॉयल क्लासेसमध्ये युवराज पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुजन झाले. नागरदळे येथील नागनाथ हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक ए. एस. मन्नुरकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन झाले. अजित पाटील यांनी शाहूंच्या विचाराची समाजाला गरज असल्याचे सांगितले. किणी येथील जयप्रकाश विद्यालयात मुख्याध्यापक पी. जे. मोहनगेकर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. राजगोळी बुद्रूक येथील दत्त हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक अनंत पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुजन झाले. अध्यक्ष बी. के. पाटील उपस्थित होते. ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुजन झाले. राजगोळी खुर्द ग्रामपंचायतीत सरपंच मावळेश्वर कुंभार यांच्या हस्ते प्रतिमा पुजन जाले. कागणी येथील व्ही. के. चव्हाण-पाटील विद्यालयात मुख्याध्यापक ए. जे. देसाई व राजू हगिदळे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55638 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top