इलेक्ट्रिक वाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इलेक्ट्रिक वाहन
इलेक्ट्रिक वाहन

इलेक्ट्रिक वाहन

sakal_logo
By

(मालिका- लोगो कालच्या टुडे १ वरून त्यात फक्त भाग तीन हे टाका )
------------
अशी घ्या इलेक्ट्रिक वाहनांची काळजी

सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : वाढत्या तापमानामुळे तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या स्थितीबद्दल काळजी वाटते का? वाटत असेल तर चांगलेच आहे; मात्र नेमकी काळजी कशी घ्यावी हे माहीत असणे हेही तितकेच महत्त्‍वाचे आहे.

इलेक्ट्रिक वाहनासाठी सावली शोधा
घराबाहेर गरम असताना, सावलीत इलेक्ट्रिक वाहन पार्क करणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे. दीर्घ कालावधीसाठी उष्णतेच्या संपर्कात असताना, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसह इलेक्ट्रिक वस्तू जास्त गरम होतात व कार्यक्षमता कमी होते.

थेट सूर्यप्रकाशात ईव्ही चार्ज करणे टाळा
तुमचे इलेक्ट्रिक वाहन जास्त काळ थेट सूर्यप्रकाशात चार्ज करू नका. कारण तुमची वाहने थेट सूर्यप्रकाशात दीर्घकाळ चार्ज केल्याने बॅटरीचे नुकसान होण्याचा धोका वाढतो, त्यांना सावलीत चार्ज करणे हा एक चांगला पर्याय आहे.

यामुळे वाढू शकते बॅटरीचे आयुष्य
नवीन तंत्रज्ञानाने बनवलेल्या काही ई-बाईक लिथियम-आयन बॅटरीसह सेन्सर्ससह सुसज्ज आहेत. ज्यामुळे तुम्हाला समस्या उद्‍भवल्यास लगेचच ओळखण्यात मदत होईल. स्मार्ट बीएमएस तुम्हाला बॅटरी ओव्हर चार्जिंग, ओव्हर डिस्चार्जिंग, ओव्हर करंट प्रोटेक्शनसह शॉर्ट सर्किट आणि तापमान संरक्षणही देते. तुमच्या इलेक्ट्रिक वाहन आणि चार्जरमध्ये व्होल्टेज आणि पॉवर व्यवस्थापित करण्यास मदत करणारी बीएमएस प्रणाली असूनही खालील उपायांमुळे तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीचे आयुष्य वाढू शकते. बॅटरीचे आयुष्य जितके जास्त असेल तितका तुमची ई-बाईक वापरताना देखभाल खर्च कमी होईल.

गाडी चालवल्यानंतर लगेच चार्ज करू नका
वाहन चालवल्यानंतर लगेचच तुमची बॅटरी चार्ज करणे टाळावे. तुमच्या वाहनाची बॅटरी पूर्णपणे रिचार्ज करण्यासाठी चार्जिंगला लावण्यापूर्वी किमान अर्धा तासाचा वेळ देणे गरजेचे आहे.

वाहन रात्री चार्ज करा
इलेक्ट्रिक वाहने रात्री चार्ज केल्याने तुमचा वेळ वाचेल. दिवसापेक्षा रात्री तापमान थंड असल्याने तुम्ही तुमची इलेक्ट्रिक वाहने रात्री चार्ज करा असा सल्ला तज्ज्ञांमार्फत दिला जातो.

अधिक वेगाने गाडी चालवणे टाळा
आवश्यकता नसताना गाडी अधिक वेगाने चालवणे टाळा. कारण यामुळे बॅटरी अधिक वेगाने संपते. ज्यामुळे बॅटरी अनेक वेळा चार्ज करावी लागते. तसेच बॅटरी व वायरिंग, मोटर ओव्हरहिट होण्यापासून वाचते.

(समाप्त)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55643 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top