
लोकराजाला अभिवादन!
19958
गडहिंग्लज : लोकराजा शाहू महाराजांना स्मृतिशताब्दीनिमित्त स्तब्धता पाळून अभिवादन करताना पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी.
19959
गडहिंग्लज : मांगलेवाडीजवळ वाहनधारक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच स्तब्धता पाळून लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन केले.
19972
गडहिंग्लज : नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे काम सुरू असलेल्या ठिकाणीच स्तब्धता पाळत लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन केले.
लोकराजाला अभिवादन!
शंभर सेकंद पाळली स्तब्धता; शाळा-महाविद्यालयात कार्यक्रम
गडहिंग्लज, ता. ६ : लोकराजा शाहू महाराजांना स्मृतिशताब्दीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सकाळी दहाला शंभर सेकंद स्तब्धता पाळण्यात आली. अगदी रस्त्यावरील वाहनधारकांपासून ते स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत सहभागी झाले होते. शासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयात कार्यक्रम झाले. शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
डॉ. घाळी महाविद्यालय
डॉ. घाळी महाविद्यालयात सुरेश पोवार, संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. अनिल उंदरे अध्यक्षस्थानी होते. डॉ. नीलेश शेळके यांनी प्रास्ताविक केले. शाहूंचा शैक्षणिक वारसा जतन करणे गरजेचे असल्याचे मत श्री. पोवार यांनी व्यक्त केले. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, सचिव बी. जी. भोसकी, संचालक किशोर हंजी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, मुख्याध्यापक विजय चौगुले आदी उपस्थित होते. डॉ. सरोज बिडकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सरला आरबोळे यांनी आभार मानले.
ओंकार महाविद्यालय
ओंकार महाविद्यालयात डॉ. शशिकांत संघराज यांचे राजर्षी शाहू महाराजांचे कार्य, विचार व आजच्या युगाकरिता संदेश या विषयावर व्याख्यान झाले. ज्येष्ठ संचालक रवींद्र कारेकर अध्यक्षस्थानी होते. राजगादीवर बसून सामान्यांच्या प्रश्नाबाबत कणव असणारे शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात, असे मत डॉ. संघराज यांनी व्यक्त केले. डॉ. काशिनाथ तनंगे यांनी स्वागत केले. प्रा. गजानन कुलकर्णी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. स्वयंप्रभा सरमगदूम, डॉ. महेंद्र जाधव यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. संजीवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रशांत कांबळे यांनी आभार मानले.
बॅ. नाथ पै विद्यालय
बॅ. नाथ पै विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमर डोमणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. पहिली ते चौथीचे विद्यार्थी विविध वेशभूषेत आले होते. २४ विद्यार्थ्यांची भाषणे झाली. स्तब्धता पाळून लोकराजाला अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक विलास जाधव उपस्थित होते. संतोष पोवार यांनी सूत्रसंचालन केले. रावसाहेब आंबुलकर यांनी आभार मानले.
गडहिंग्लज हायस्कूल
गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माजी प्राचार्य एस. एन. देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. प्रा. एम. एस. शिंदे, एस. डी. कांबळे यांनी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली. व्ही. आर. पालेकर यांनी पोवाड्यातून शाहूंच्या शैक्षणिक कार्याची माहिती दिली. पर्यवेक्षक पी. टी. पाटील यांनी आभार मानले.
क्रिएटिव्ह हायस्कूल
येथील क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये स्तब्धता पाळून शाहू महाराजांना वंदन केले. सचिव अण्णासाहेब बेळगुद्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक दिनकर रायकर यांनी शाहू महाराजांविषयी माहिती दिली. स्नेहा पारधे यांनी स्वागत केले. आण्णासाहेब घेवडे यांनी आभार मानले.
किलबिल विद्यामंदिर
किलबिल विद्यामंदिरमध्ये शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षकांनी १०० सेकंद स्तब्धता पाळली. संस्थेच्या अध्यक्षा अंजली हत्ती, डॉ. सरस्वती हत्ती, दयानंद हत्ती आदी उपस्थित होते.
ए. डी. शिंदे पॉलिटेक्निक
भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे पॉलिटेक्निकमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी निमित्त १०० सेकंद स्तब्ध राहून आदरांजली वाहिली. संस्थेचे सल्लागार महेश कोरी यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. प्राध्यापक, विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासकीय सेवा महाविद्यालय
महाराष्ट्र प्रशासकीय सेवा महाविद्यालयात प्रतिमा पुजन झाले. प्रभारी प्राचार्या गंगाली पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली. भाग्यश्री कोकितकर, सुप्रिया देशवळ, अंजली रामजी या विद्यार्थिनींचीही भाषणे झाली. १०० सेकंद स्तब्धता पाळून शाहू महाराजांना मानवंदना देण्यात आली. प्रा. नारायण पोवार यांनी आभार मानले.
हलकर्णी परिसर
नूल : हलकर्णी परिसरात शाहूंना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी ओबीसी सेल जनसंपर्क कार्यालयात चंद्रकांत गुरवानगोळ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. जिल्हा अध्यक्ष डॉ. गंगाधर व्हसकोटी, माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुनोळी, शिवकुमार संसुद्धी, अशोक पाटील, आसिफ खलिफा आदी उपस्थित होते. गांधीनगर शाळेत भरत बिद्रेवाडी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. मुख्याध्यापिका वैशाली धबाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुनीता जाधव, वैशाली जोशिलकर उपस्थित होते. ऊर्दू शाळेत अमानुल्ला मालदार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. मुख्याध्यापक प्रवीण दिडबाग, अफसाना नंदिकर, शबाना पटेल यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्थानक, मुख्य चौक, विविध शाळेत शंभर सेकंद स्तब्धता पाळून लोकराजाला मानवंदना देण्यात आली.
चौकट...
गडहिंग्लज शहरातून ज्योत...
लोकराजा शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीचा मुख्य सोहळा कोल्हापूर येथे होता. या सोहळ्यात गडहिंग्लजचे शाहू प्रेमी सहभागी झाले होते. त्यांनी गडहिंग्लजवरुन ज्योत नेली होती. स्वाती कोरी, विद्याधर गुरबे, सुनील शिंत्रे, नागेश चौगुले, उदय कदम, सुनीता पाटील, शशिकला पाटील, शकुंतला हातरोटे, नाज खलिफा, युवराज बरगे, प्रकाश भोईटे, रमजान अत्तार, राहुल शिरकोळे, प्रतीक क्षीरसागर, अवधूत पाटील, सागर पाटील यांच्यासह शाहूप्रेमी सहभागी झाले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55660 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..