राजर्षींना स्तब्धतेतून अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजर्षींना स्तब्धतेतून अभिवादन
राजर्षींना स्तब्धतेतून अभिवादन

राजर्षींना स्तब्धतेतून अभिवादन

sakal_logo
By

19916, 19885, 19886
इचलकरंजी : छत्रपती शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त १०० सेकंद स्तब्ध राहून अभिवादन करताना. (छायाचित्र ः पद्माकर खुरपे)
2)
रुई : संदीप शेटाणे यांनी शेतातील नांगरट थांबवून अभिवादन केले.
3)
रांगोळी : येथील अक्षय भगत यांची मुहूर्तमेढ थांबवून परिवाराने स्तब्धता पाळली.


राजर्षींना स्तब्धतेतून अभिवादन
---
शहरसह परिसरात शाहू महाराजांच्या कार्याचा जागर; स्मृतिशताब्दी दिनी विविध कार्यक्रम
इचलकरंजी, ता. ६ : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी दिनी अवघे इचलकरंजी शहर १०० सेकंद स्तब्ध राहून कृतज्ञ झाले. शहर व परिसरात शाहू महाराजांच्या कार्याचा जागर करीत राजर्षी शाहूंचा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी पार पडला. शाळा-महाविद्यालयांत ग्रंथ प्रदर्शन, व्याख्याने, निबंध स्पर्धा यासह विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
पालिका प्रशासनातर्फे शहरातील छत्रपती शाहू महाराज पुतळ्यासमोर एकत्रित जमून सकाळी दहाला १०० मिनिटे स्तब्ध उभे राहत शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, मदन कारंडे, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, उपमुख्याधिकारी केतन गुजर यांच्यासह पालिका प्रशासन, पोलिस प्रशासनाचे अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पालिका प्रशासनाने शिवतीर्थ, शाहू चौक, मलाबादे चौक, गांधी पुतळा आदी ठिकाणी सायरन असलेल्या गाड्या, घंटागाड्या व पोलिस दलाच्या सायरन गाड्या तैनात केल्या होत्या. दहाला सायरन वाजवून मानवंदना देण्यात आली.

काँग्रेस कमिटी
काँग्रेस कमिटीतर्फे आदरांजली वाहण्यात आली. या वेळी महाराष्ट्र कॉग्रेस प्रेदश सचिव शशांक बावचकर, इचलकरंजी कमिटी अध्यक्ष संजय कांबळे, राहुल खंजीरे, शशिकांत देसाई, बाबासाहेब कोतवाल,किशोर जोशी, भूषणशहा,प्रमोद खुडे,रमा बावचकर,मीना बेडगे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

विकास विद्या मंदिर
विकास विद्या मंदिरमध्ये आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी राजर्षींच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. सपना मेळवंकी, विकास चौगुले,संगीता हत्तरगी, दत्तात्रय देसाई, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

शाहू हायस्कूल
राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये लोकराजा शाहू महाराजांची जीवन कार्य या विषयी व्याख्यान झाले. या वेळी प्रमुख पाहुणे संजय बुगटे, राजू नदाफ, मुख्याध्यापक शंकर पोवार,सचिन कांबळे डॅनियल फॅन्सीस , वसंत सपकाळे, नम्रता गुरसाळे उपस्थित होते.

राष्ट्र सेवा दल
राष्ट्र सेवा दलतर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना शाहू पुतळा इचलकरंजी येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी इचलकरंजीचे संघटक रोहित दळवी, श्रेयस बदडे, अमोल पाटील, वैभवीआढाव, उर्मिला कांबळे, स्नेहल माळी,सुभाग्या कोटगी, आमृता कोनीरे, दामोदर कोळी, विभा नकाते, रुचिता पाटील आदी उपस्थित होते.

दिगंबर जैन बोर्डिंग
दिगंबर जैन बोर्डिंगतर्फे वृक्षारोपण करून अभिवादन करण्यात आले. प्रथम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बाळासाहेब केटकाळे, सुभाष बलवान, तीर्थंकर मानगावे,कौस्तूभ लवटे, ओंकार मोरे, वृषभ पाटील, महावीर केटकाळे, एस.पी चौगले, संतोष शिंदे, ज्योती नेजे, कमल मानकापुरे, अक्षय खोंद्रे उपस्थित होते.

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजील वाहिली. या वेळी अधीक्षक डॉ. रवींद्र शेटे, डॉ. महेश महाडीक, तेजस पाटील, यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.

लिंबू चौक
लिंबू चौक येथील आलमगीर मशिदीमध्ये शाहू महाराजांना मानवंदना वाहिली. या वेळी देशात परिस्थिती कशीही होवो मात्र आम्ही शाहू महाराजांचे विचार घेवून हिंदू मुसलीम एकी कायम राखणार असल्याचे सांगितले.

रवी रजपुते सोशल फौंडेशन
रवी रजपुते सोशल फाउंडेशनतर्फे छत्रपती शाहू महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी रवी राजपुते यांनी तरुणांनी शाहू महाराजांचे विचार आत्मसाद करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

महात्मा गांधी हौसिंग सोसायटी
महात्मा गांधी हौसिंग सोसायटीतर्फे राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अजिंक्य निंबाळकर, दिगंबर निंबाळकर, शमूवेल जगताप, अमर निंबाळकर, सुनील लोखंडे, आदि उपस्थित होते.

चौगुले प्राथमिक विद्यामंदिर
जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्यामंदिरमध्ये आदरांजली वाहण्यात आली. या वेळी सुभाष कडाप्पा,तीर्थकर माणगावे, वर्षा हुल्ले, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

समाजवादी प्रबोधिनी
समाजवादी प्रबोधिनीत राजर्षींच्या प्रतिमेला किरण कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. राजर्षी शाहू महाराजांवरील ग्रंथाचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. या वेळी पांडुरंग पिसे, प्रकाश कांबळे, सौदामिनी कुलकर्णी, मनोहर जोशी, नंदा हालभावी, अश्विनी कोळी, सर्जेराव जाधव आदी उपस्थित होते.

डीकेएएससी महाविद्यालय
शाहू महाजारांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांच्या हस्ते झाले. शाहू महाराजांच्या ग्रंथाचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रा. अरूण कटकोळे यांचे व्याख्यान झाले. डॉ. डी. सी. कांबळे, प्रा. डी. ए. यादव, प्रा. एकनाथ आळवेकर, मेजर मोहन वीरकर, प्रा. विशाल गोडबोले, प्रा. भारती कोळेकर आदी उपस्थित होते.

भारती प्राथमिक विद्या मंदिर
शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुजन संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ तेलनाडे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थी, शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. राजकुमार बेडक्याळे, मुख्याध्यापक शिवाजी पाटील, अशोक निंबाळकर, सुचेत्रा चौगुले आदी उपस्थित होते.

व्यंकटेश महाविद्यालय
प्राचार्य डॉ. विजय माने यांच्या हस्ते शाहू महाजारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. आर. व्ही. सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. जनता बँक ते राजवाडा चौक प्रमुख मार्गावर महाविद्यालयाच्या एनएसएस स्वयंसेवकांनी नागरिकांना आवाहन करत शाहू महाराजांना १०० सेकंद स्तब्धता पाळून आदरांजली वाहली. प्रा. अमीन बाणदार, डॉ. डी. एस. कांबळे, उपप्राचार्य डॉ. एन. एम. मुजावर यासह प्राध्यापक उपस्थित होते.
-----------
अब्दुललाट परिसर
शाळा, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, रिक्षा संघटना, व्यापारी,ग्रामस्थ यांनी संयुक्तरीत्या ग्रामसचिवालय येथे अभिवादन कार्यक्रम झाला. शिरदवाड, शिवनाकवाडी, लाटवाडी या गावांमध्ये देखील ग्रामपंचायततर्पे शाहूंना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, सरपंच पांडुरंग मोरे, उपसरपंच चौगुले, सदस्य, नागरिक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55673 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top