- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-
-

-

sakal_logo
By

20016
आजरा ः येथील छत्रपती शिवाजी स्मारक समोर राजर्षी शाहू छत्रपतींना अभिवादन करताना मराठा महासंघाचे पदाधिकारी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, विविध मान्यवर व ग्रामस्थ.

आजऱ्यात विविध कार्यक्रमांतून अभिवादन
आजरा, ता. ६ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त आजरा तालुक्यात कृतज्ञता पर्व अंतर्गत अभिवादन करण्यात आले. आजरा तालुक्यात शासकीय, निमशासकीय संस्था, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम झाला. सकाळी दहा वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
आजरी येथे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर शंभर सेकंद स्तब्धता पाळून अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, पदाधिकारी, ग्रामस्थ, नागरिक उपस्थित होते. येथील नाईक गल्लीसह विविध गल्ल्यामध्ये राजर्षी शाहू यांना अभिवादन करण्यात आले. नाईक गल्ली येथील मरकज मस्जिद समोर मुस्लीम बांधव एकत्र आले होते. या वेळी नगरसेवक आलम नाईकवाडे, नगरसेविका रेश्मा सोनेखान, यूनुस सय्यद, बाबू, दरवाजकर, सिलेमान दरवाजकर, मजीद पठाण, मुस्ताक ढालाईत यांच्यासह मुस्लीम बांधव उपस्थित होते. येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू छत्रपती यांच्या प्रतिमेचे पुजन आजरा महाल शिक्षण संस्थचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते झाले. प्रा. शिवाजी पारळे यांनी शाहूंच्या जीवनकार्याची माहिती दिली. या वेळी सचिव एस. पी. कांबळे, संचालक सुनिल देसाई, माजी प्राचार्य एस. बी. गुरव, एस. जी. खोराटे, पर्यवेक्षक आर. जी. कुंभार यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. पी. व्ही. पाटील यांनी सुत्रसंचालन केले. येथील स्वामी विवेकानंद शिक्षण व संस्कृती प्रसारक मंडळ आजरा संचलित पंडीत दीनदयाळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राजर्षी शाहूंच्या प्रतिमेचे पुजन शिवाजी येळेकर यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापक विजय राजोपाध्ये यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती निर्मळे यांनी शाहुंच्या जीवनकार्याची माहिती दिली. कृष्ठ रोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत तालुका व जिल्हा पातळीवर निबंध स्पर्धेत यश मिळवलेली श्रृती आनंदा कांबळे हीचा व मार्गदर्शक शिक्षीका श्रीमती निर्मळे यांचा सत्कार झाला. केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस. एम. चव्हाण होते. मुख्याध्यापक श्री. चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. यु. के. जाधव यांनी प्रास्ताविकात राजर्षी शाहूंच्या कार्याचा आढावा घेतला. आर. एस. पाटील यांनी शाहूंच्या जीवनकार्याची माहिती दिली. या वेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55702 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top