स्मारकासाठी 400 कोटींचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मारकासाठी 400 कोटींचा
स्मारकासाठी 400 कोटींचा

स्मारकासाठी 400 कोटींचा

sakal_logo
By

शाहू मिलमधील स्मारकाचा आराखडा तयार
प्रशासक कादंबरी बलकवडे; ४०० कोटींच्या आराखड्यात मिळणार इतिहासाला उजाळा
कोल्हापूर, ता. ६ : शाहू मिल येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारकासाठी ४०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. यासाठी लागणारा निधी तीन टप्प्यात मागणी केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी दिली. शाहू मिलची मूळ ओळख जपून पर्यटक, विद्यार्थी, स्थानिक नागरिकांना कोल्हापूरची संस्कृती, कला, इतिहास आणि शाहू महाराज यांचा इतिहासाचा समावेश आराखड्यात केला आहे. राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वादरम्यान आज शाहू मिल येथे प्रचंड जनसागराने लोकराजा शाहू महाराज यांना १०० सेकंद स्तब्ध राहून अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. दरम्यान, चित्रफितीद्वारे आरखडा कसा असणार याची सचित्र माहिती दिली.
कोल्हापूरच्या उद्योग आणि कलांना शिक्षणाने बळकटी आणण्यासाठी प्रयत्न केला आहे. स्थानिक कलाकारांना आणि देशभरातील कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळावे आणि क्रीडा जलतरण, नेमबाजी, कुस्तीमध्ये कोल्हापुरातील खेळाडू नावलौकिक मिळवत आहेत. याचाही यामध्ये समावेश आहे. आराखड्यामध्ये स्मारकात जाण्यासाठी शाहू मिलचे मूळ प्रवेशद्वार, शाहू मिल बसस्थानक आणि शिक्षण संस्थेकडे जाणारी अशी तीन दरवाजे आहे. आपले स्वागत सम्राट यंत्राने होईल. जे शाहू मिलच्या टाईम ऑफिसचे प्रतिक आहे. मिलची चिमणीजवळून पुढे आल्यानंतर स्मारकाविषयक माहिती केंद्र, पोलिस निरीक्षक केंद्र, स्वच्छता गृह, प्रतिक्षालय, एटीएम आणि परकीय चलन देवाण-घेवाण असणारी दोन दालन नियोजित केली आहेत. अंबाबाईचे प्रतिक असणारे श्रीयंत्राची प्रतिमा असणाऱ्या कारंजाजवळ आपला वेळ घालवता येईल. याच चौकाच्या उजव्या बाजूला प्रदर्शन दालन असेल. यामधील एक दालन राजर्षी शाहू आणि शाहू मिलच्या इतिहासाला उजाळा देईल.
दुसरे दालन कलाकारांसाठी त्यांच्या कला प्रदर्शित करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. खुल्या सभागृहात वस्त्र, संगीत, वाद्य, कला दालन आणि कोल्हापूरच्या चित्रपट निर्मितीसाठी फिल्म दालन असेल. शाहू मिलच्या चिमणीजवळ आठवड्या बाजार चवथरा असेल व कोल्हापूरच्या इतिहासाचा अभ्यास करणारे एक सुसज्ज वाचनालय असणार आहे. चिमणीच्या डाव्या बाजूला नृत्य आणि नाट्य विद्यालय करण्यात येईल. या ठिकाणी दोन सुसज्ज नाट्यगृहे असतील. कोटीतीर्थ तलावाकडील बाजूस १२०० क्षमतेचे खुले नाट्यगृह असेल. स्मारकाच्या मध्यवर्ती इमारतीच्या ठिकाणी कोल्हापूर कला आणि लघु उद्योगातील साहित्य असेल. शैक्षणिक संकुलामध्ये वेदपाठशाळा, चर्मोद्योग, वस्त्रोउद्योग आणि खाद्य असे विभाग असतील. कोटीतीर्थ येथे घाटबांधणी आणि खाऊ गल्ली असणार आहे. २५०० दुचाकी आणि पाचशे चारचाकी वाहने बसतील ऐवढे अंतर्गत पार्किंग असेल. असा सर्वकश आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये आवश्‍यक बदलही केले जाणार आहेत.


मूळ वैशिष्ट्यांचा समावेश
शाहू मिल येथे शाहू स्मारक आराखडा तयार करताना आराखड्यामध्ये मूळ नवीन वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग, मनोरंजन, निर्सग, निसर्गाशी नाते दृढ करणाऱ्या बाबींचा समावेश केला आहे. शाहू मिलच्या स्थापत्य केलेच पूर्ण जतन करत त्यातील सामर्थ्याचा विचारही आराखडा तयार केला आहे. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण आणि स्मारक या चतुसुत्रीवर आधारित आराखडा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55704 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top