झिरो शॅडो डे साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झिरो शॅडो डे साजरा
झिरो शॅडो डे साजरा

झिरो शॅडो डे साजरा

sakal_logo
By

19961
कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगर परिसरात भर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अनेकांनी गायब झाल्याचा अनुभव आला.
(नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)

...अन् सावलीच गायब झाली!

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : आपली सावली कधीच साथ सोडत नाही. मात्र, आज दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 11 सेकंदापासून ते 12 वाजून 30 मिनिटेपर्यंत जवळ जवळ 50 सेकंदापर्यंत सावली चक्क अदृश्य झाली. ही सावली पायाखाली आली. त्यामुळे अनेकांना सावली गायब झाल्याचा अनुभव आला. विवेकानंद कॉलेजच्या प्रांगणात भौतिकशास्त्र व खगोल शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी शुन्य सावली दाखविण्यासाठी शास्त्रीय उपकरणांद्वारे विद्यार्थ्यांना माहिती दिली.
ते म्हणाले, ‘‘खगोल शास्त्रात या घटनेला शून्य सावली अथवा झिरो शॅडो म्हणतात. कर्क आणि मकर वृत्तामध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षांतून दोन वेळेला हा शून्य सावलीचा आनंद घेता येतो. मात्र, जे लोक कर्क वृत्त, मकर वृत्त आणि विषुव वृत्त या ठिकाणी राहतात, त्यांना वर्षातून एकदाच याचा आनंद घेता येतो तर कर्कवृत्ताच्या वरच्या भागात आणि मकर वृत्ताच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांना मात्र शून्य सावली दिवसाचा आनंद घेता येत नसतो. या काळात आपण जर सावधान स्थितीत उभे राहून अथवा आपल्या जागेवरीती उडी मारून पहिले तर आपली सावली आपणास दिसणार नाही.

चौकट
आता 6 ऑगस्टला...
बरोबर तीन महिन्यांनी सूर्याच्या दक्षिणायन काळात 6 ऑगस्ट 2022 ला दुपारी 12 वाजून 39 मिनिटांपासून 50 सेकंदपर्यंत परत एकदा शून्य सावलीचा आनंद घेता येणार आहे. पृथ्वी जसजशी फिरत जाईल तसे महाराष्ट्रात विविध स्थानी आपणाला शून्य सावलीचा आनंद घेता येतो, असे डॉ. कारंजकर म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55711 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top