आजरा ः संजय गांधी योजना बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः संजय गांधी योजना बातमी
आजरा ः संजय गांधी योजना बातमी

आजरा ः संजय गांधी योजना बातमी

sakal_logo
By

आजऱ्यात निराधार योजनेच्या
११३३ प्रकरणांना मंजुरी; डिसोझा

आजरा, ता.७ ः आजरा तालुक्यात संजय गांधी योजनेच्या ११३३ प्रकरणांना मंजुरी दिली आहे. समिती गठीत झाल्यानंतर केवळ आठ महिन्यांत समितीने लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केल्याचे संजय गांधी समितीचे आजरा तालुकाध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांनी सांगितले. येथील तहसील कार्यालयात संजय गांधी समिती सदस्यांची बैठक झाली. यावेळी ५० प्रकरणे मंजूर केली. या वेळी श्री. डिसोझा म्हणाले, ‘गरीब, गरजू पात्र लाभार्थ्यांना संजय गांधीच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. कोणीही पात्र लाभार्थी या योजनापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली आहे. मार्चपर्यंतचे अनुदान प्रत्येक लाभार्थ्यांना मिळाले आहे. आठ महिन्यांच्या कालावधीत संजय गांधीची ३४८, श्रावण बाळ योजनेची ६९०, इंदिरा गांधी वयोवृध्द योजनेची ४५ प्रकरणे मंजूर केली आहेत. काही प्रकरणे दुबार येत असल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. लाभार्थ्यांनी खात्री करूनच दुसऱ्या वेळी प्रकरण द्यावे. अन्यथा कारवाई केली जाईल,’ असेही डिसोजा यांनी सांगितले. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र, गरजू व्यक्तींनी समिती सदस्य, तलाठी व तहसील कार्यालयाशी संपर्क करावा. यावेळी समिती सचिव तथा तहसीलदार विकास अहिर, नायब तहसीलदार डी. डी. कोळी, काशिनाथ तेली, दीपक देसाई, उत्तम देसाई, शिवाजी आढाव, रवींद्र भाटले, आशाताई चव्हाण, बयाजी येडगे आदी उपस्थित होते. एस. पी. कांबळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55724 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top