मंत्री सामंत प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री सामंत प्रेस
मंत्री सामंत प्रेस

मंत्री सामंत प्रेस

sakal_logo
By

शाळा, महाविद्यालयात
शाहू गौरवगाथेचे वाटप
मंत्री उदय सामंत; मनसेसह इतर पक्षांतील काही जण लवकरच सेनेत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः शालेय जीवनातच राजर्षी शाहू महाराजांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात रूजवण्यासाठी व त्यांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी शाळा, महाविद्यालयातील दहा हजार विद्यार्थी व ग्रामीण भागातील ग्रंथालयांना शासनाच्यावतीने शाहू गौरवगाथा क्रांती खंडाचे वाटप केले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री. सामंत यांनी आज विद्यापीठाला भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, मनसेसह इतर पक्षांतील काही विद्यमान आणि माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास उत्सुक आहेत, असेही श्री. सामंत म्हणाले.
मंत्री सामंत म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीच्या नेत्यांवर काही जणांकडून होणारी टिका ही स्वत:चा टीआरपी वाढविण्यासाठी होत आहे. आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांबाबत आमचे पक्षप्रमुख जे आदेश देतील त्यानुसार कोल्हापूरमध्ये शिवसेना कार्यरत राहील.’’
शिवाजी विद्यापीठासह राज्यातील सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरूंनी ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून श्री. सामंत म्हणाले, ‘‘शिवाजी विद्यापीठातील लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी मंजूर केलेल्या ३ कोटीच्या निधीपैकी ३६ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश विद्यापीठाकडे सुपूर्द केला आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शिनोळी येथील केंद्रात विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. राजाराम महाविद्यालयाला दुरुस्तीसाठी दोन कोटी, तर शासकीय तंत्रनिकेतनला तीन कोटी रुपये देण्यात येतील.’’
विद्यापीठांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी ‘मंत्रालय आपल्या दारी’ उपक्रम जूनपासून राज्यात पुन्हा राबविण्यात येईल. राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन, इंजिनिअरींग आणि फार्मसी कॉलेजच्या स्वच्छता, रंगरंगोटीसाठी प्रत्येकी १५ लाखांचा निधी दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. गजानन पळसे, आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55728 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top