निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

२९३८
मालूबाई पाटील
राशिवडे बुद्रुक : शिरगांव (ता. राधानगरी) येथील मालुबाई वसंत पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नांतवडे असा परिवार आहे. राधानगरी तालुका अंक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष व ‘सकाळ’ चे अंक विक्रेते राजेंद्र पाटील यांच्या त्या आई होत.

२००५२
रंगराव साळोखे
टोप : संभापूर (ता. हातकणंगले) येथील रंगराव भाऊसाहेब साळोखे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.

२००४४
सर्जेराव शिंदे
कोल्हापूर : भोगम कॉलनी, कळंबा येथील सर्जेराव रघुनाथ शिंदे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) कळंबा स्मशानभूमी येथे आहे.

२००४५
शरयू शिंदे
कोल्हापूर : रंकाळवेश, एसटी स्टँड जवळील श्रीमती शरयू लक्ष्मण शिंदे (वय ८५) यांचे निधन झाले. अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे उपाध्यक्ष आणि पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय शिंदे यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

३५२२
शांताबाई इंगवले
कागल : निपाणी येथील श्रीमती शांताबाई महादेव इंगवले (वय ८०) यांचे निधन झाले. येथील किसान कृषी विकास केंद्राचे मालक विजय इंगवले यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

००९७९
पार्वती पाटील
भुये : भुयेवाडी (ता. करवीर) येथील पार्वती धोंडिराम पाटील (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

१६३६
माधुरी मानकर
बांबवडे ः सोनवडेपैकी मानकरवाडी (ता. शाहूवाडी) येथील माधुरी पांडुरंग मानकर (वय ३०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी सासू, सासरे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. ७) आहे.

२००२७
मरियमबी पठाण
कोल्हापूर : मरियमबी शरीफखान पठाण (वय ७८) यांचे निधन झाले. त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर कौन्सिल सदस्य तसेच फेरीवाला संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते इम्तियाज पठाण यांच्या मातोश्री होत. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

२००२८
सुप्रिया वाघमारे
कोल्हापूर : म्हाडा कॉलनी येथील सुप्रिया अशोक वाघमारे (वय २७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

२००२९
बाळासाहेब लंबे
कोल्हापूर : रूईकर कॉलनी येथील बाळासाहेब विश्वनाथ लंबे (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माती सावरणे विधी रविवारी (ता. ८) लिंगायत रुद्रभूमि येथे आहे.

२००३२
विजय पारखे
कोल्हापूर : मालती निवास,अंबाई डिफेन्स कॉलनी येथील विजय हिंदुराव पारखे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी उमादेवी, दोन मुली, जावई, नातवंडे, दोन बंधू आणि भगिनी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ७) आहे.

२००३३
बाजीराव पाटील
कोल्हापूर : केर्ली येथील बाजीराव गोपाळ पाटील (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन विवाहित मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.

२००४०
अमित दड्डीकर
कोल्हापूर : विश्‍वकर्मा कॉलनी, जवाहर नगर येथील अमित दड्डीकर यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ७) आहे.

२००४६
केरबा कुंभार
कोल्हापूर : साने गुरुजी वसाहत येथील केरबा कृष्णा कुंभार यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ८) आहे.

२००४८
विद्या डांगरे
कोल्हापूर : सौ. विद्या प्रल्हाद डांगरे (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुली असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55732 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top