
शाहू महाराजांना आदरांजली
‘सकाळ’च्या कार्यालयात आदरांजली
इचलकरंजी : ‘सकाळ’च्या कार्यालयामध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी निमित्त १०० सेकंद स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी बातमीदार पंडित कोंडेकर, संदीप जगताप, सहाय्यक व्यवस्थापक (विक्री) दत्ता टोणपे, संतोष जेरे, संतोष शिंदे, उपस्थित होते. यावेळी शाहूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
गंगामाई विद्या मंदिर
गंगामाई विद्या मंदिरमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्याध्यापिका सोनवणे यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन आले. या वेळी विद्यार्थी, पालक, कर्मचारी उपस्थित होते.
सन्मति बौद्धिक अक्षम शाळा
जैन संस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचालित सन्मति बौद्धिक अक्षम मुलांची शाळेमध्ये आदरांजली वाहण्यात आली. यावे ळी मुख्याध्यापिका संगीता कुंभार यांच्या सह शिक्षक,शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते.
शहापूर हायस्कूल
जयवंतराव आवळे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शहापूर हायस्कूल शहापूरमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. कथाकथन, प्रश्नमंजूषा, विज्ञान प्रदर्शनामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आला. या वेळी एच. आर कांबळे, आर. ए सुतार, एम.जी निर्मळे, एस.पी पाटील उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55736 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..