निवडणूक आयोगाला माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक आयोगाला माहिती
निवडणूक आयोगाला माहिती

निवडणूक आयोगाला माहिती

sakal_logo
By

आयोगाने घेतली प्रभागरचनेची माहिती
महापालिका निवडणूक; सद्यस्थितीत दोनेक टप्प्यात कार्यवाहीची शक्यता

कोल्हापूर, ता. ६ ः सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीबाबत दिलेल्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने कार्यवाही सुरू केली असून महापालिकेने सादर केलेल्या प्रभागरचनेबाबतची माहिती आज उपायुक्तांकडून घेतली. मार्चमध्ये पालिकेने त्रिसदस्यीय प्रभागरचना करून अभिप्रायासह पाठवली आहे.
बुधवारी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पुढील कार्यवाही कोणाकडून तसेच कशाबाबतची होते याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष लागून होते. निवडणूक आयोगाकडून कार्यवाही अपेक्षित होती. त्यानुसार गुरुवारी रात्रीच शुक्रवारी सकाळी प्रभागरचना तसेच निवडणूक प्रक्रियेबाबतची माहिती घेऊन मुंबईला येण्‍याचा निरोप आयोगाकडून आला. त्यानुसार महापालिका प्रशासनाने मार्च २०२२ पर्यंत काय कार्यवाही केली आहे, याची माहिती एकत्र करून उपायुक्त रविकांत आडसूळ मुंबईला रवाना झाले.
आज दिवसभर आयोगाने महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या सद्यस्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या समिती ठेवल्या होत्या. महापालिकेच्यावतीने उपायुक्त आडसूळ यांनी प्रभाग रचनेची माहिती दिली. ती कोणत्या टप्प्यापर्यंत झाली होती, मतदार यादीबाबतची काय स्थिती आहे, तसेच त्यात बदल काही झाला आहे का, लोकसंख्या अशा बऱ्याच घटकांची माहिती आयोगाने जाणून घेतली. यानंतर आयोगाकडून काही पाऊले उचलली जाणे अपेक्षित आहे. कदाचित सद्यःस्थिती लक्षात घेऊन महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचे टप्पे केले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55751 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top