लक्ष्मीसेन उत्तराधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मीसेन उत्तराधिकारी
लक्ष्मीसेन उत्तराधिकारी

लक्ष्मीसेन उत्तराधिकारी

sakal_logo
By

लक्ष्मीसेन जैन मठाचे
भरतेश पाटील उत्तराधिकारी
रविवारी रायबाग येथे घोषणा व ब्रह्मचर्य व्रतारोहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः येथील शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन जैन मठाचे उत्तराधिकारी म्हणून हालोंडी (ता. हातकणंगले) येथील भरतेश सुभाष पाटील यांच्या नावाची रविवारी (ता.८) घोषणा होणार आहे. मठाच्या उत्तराधिकारी शोध समितीच्या वतीने रायबागमध्ये उत्तराधिकारी नावाची घोषणा व ब्रम्हचर्य व्रतारोहन कार्यक्रम होणार आहे. स्वस्तिश्री चारूकिर्ती भट्टारक भट्टाचार्य महास्वामीजी (श्रवणबेळगोळ) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होणार आहे. दरम्यान, भरतेश पाटील अठ्ठावीस वर्षीय असून त्यांचे श्रवणबेळगोळ येथे बी.ई. (मेकॅनिकल) शिक्षण झाले आहे.
उत्तराधिकारी शोध समितीचे अध्यक्ष आमदार अभय पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार वीरकुमार पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार कल्लप्पाण्णा मग्गेणावर, माजी आमदार मोहन शहा, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, चेअऱमन रावसाहेब जिन्नाप्पा पाटील, मुख्य महामंत्री डॉ.अजित पाटील, भरतेश शिक्षण संस्थेचे संचालक विनोद दोडण्णावर यांची प्रमुख उपस्थिती असेल. सकाळी सहा ते सात या वेळेत मंगल वाद्यघोष, सात ते आठ या वेळेत संध्यावंदन व सकलीकरण, आठ ते दहा या वेळेत भगवंतांचा पंचामृत अभिषेक, शांतीमंत्र जप होईल. त्यानंतर दुपारी दोन वाजता कोल्हापूर, रायबाग, होसूर, बेळगाव येथील समस्य दिगंबर जैन समाजाची आमसभा होईल. त्यानंतर ब्रम्हचर्य व्रतारोहन आणि आशिर्वचन कार्यक्रम होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55754 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top