
समाज मंदिरात नूलला अभिवादन
समाज मंदिरात
नूलला अभिवादन
नूल, ता. ६ : येथील समाज मंदिरामध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष विनोद सत्यनाईक यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन झाले. स्वप्निल कांबळे यांचे भाषण झाले. यावेळी अमित केदारी, विश्वनाथ नंदनवाडे, भगवान सुर्यवंशी, अशोक बालेशगोळ, केंपान्ना आळापगोळ, पोलिस पाटील परशुराम सरनाईक,किरण कांबळे उपस्थित होते. जरळी हायस्कूलमध्ये सुभाष काळे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. मुख्याध्यापक विठ्ठल चौगुले, बसवराज बाबांनावर, एन.एस.लोंढे, एल. आर.मगदूम , विवेक मास्तोळी,आर. टी. कांबळे,ए. ए. जाधव, अशोक चित्तारी उपस्थित होते. ग्रामपंचायतीमध्ये भीमगोंडा पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील विलास बागडी, काका दुडगे, राहुल पाटील, काशीनाथ जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55755 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..