खंडोबा तालीम चा यजमान पी. टी.एम. ला दे धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडोबा तालीम चा यजमान पी. टी.एम. ला दे धक्का
खंडोबा तालीम चा यजमान पी. टी.एम. ला दे धक्का

खंडोबा तालीम चा यजमान पी. टी.एम. ला दे धक्का

sakal_logo
By

20039
कोल्हापूर : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खंडोबा तालीम विरुद्ध पाटाकडील यांच्या सामन्यातील चुरशीचा क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

खंडोबा तालीम संघाचा
‘पीटीएम’ला दे धक्का

कोल्हापूर, ता. ६ : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ संघाने यजमान पाटाकडील तालीम मंडळ संघाला धक्का दिला. त्यांनी सामन्यात १- ० ने विजय मिळवत साखळी फेरीत प्रवेश केला.
खंडोबा संघाने आक्रमक चाली रचत पाटाकडील संघावर दबाव आणला. याचा फायदा घेत प्रभू पोवार याने सामन्याच्या २६ व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर आणखीन आक्रमक खेळ खंडोबा संघाने केला. मात्र, त्यांच्या संधी वाया गेल्या. पाटाकडीलचा खेळ साजेसा झाला नाही. त्यांना मिळालेल्या संधीचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाही. सामन्याचा पूर्वार्ध १-० असा राहिला. उत्तरार्धात पाटाकडील संघाला सुरुवातीलाच संधी मिळाली. मोकळ्या गोल जाळीत ओमकार जाधव याच्या पासवर ऋषिकेश मेथे- पाटील याने मारलेला फटका खांबावर जाऊन आदळला आणि संधी वाया गेली. यानंतर खंडोबा संघाने सूत्रबद्ध चाली रचत पाटाकडील संघाला मैदानात खेळवत ठेवले. अखेर पूर्णवेळ सामना १-० असा राहून खंडोबाने सामना जिंकला. त्यांनी साखळी फेरीत प्रवेश केला. सामन्यातील लढवय्या खेळाडू म्हणून पाटाकडीलच्या रोहित देसाई याला गौरवण्यात आले.

आजचे सामने
संध्याकाळी चार - शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध जुना बुधवार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55756 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top