तिलोत्तमाबेन नेवगी आदरांजली सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिलोत्तमाबेन नेवगी आदरांजली सभा
तिलोत्तमाबेन नेवगी आदरांजली सभा

तिलोत्तमाबेन नेवगी आदरांजली सभा

sakal_logo
By

२००६१


तिलोत्तमाबेन नेवगी सर्वसामान्यांच्या आधारवड
डॉ. सुनीलकुमार लवटे; आदरांजली सभेत स्मृतींना उजाळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : स्वतः मोठे असताना इतरांचे आधारवड बनवणे ही शिकवण तिलोत्तमाबेन सत्येंद्र नेवगी यांनी समाजाला दिली आहे आणि त्यांच्या विचाराने चालणे हीच खरी आदरांजली आहे, असे मत आज ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले. नेवगी यांच्या आदरांजली सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांच्या ताराबाई पार्क येथील घरी आज सायंकाळी ही सभा झाली.
दरम्यान, तिलोत्तमाबेन नेवगी यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन त्यांचे काम पथदर्शी असल्याचे डॉ. लवटे यांनी येथे सांगितले.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांनी तिलोत्तमाबेन नेवगी यांचे विचार समाजाला प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
ॲड. संतोष शहा यांनी नेवगी यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याचे सांगून त्यांनी कधीही मोठेपणा न दाखवता समाजातील सर्वसामान्यांत मिसळण्यास अधिक महत्त्व दिले, असे सांगितले.
सुनील नेवगी यांनी आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर यांनी तिलोत्तमाबेन नेवगी यांनी विद्यार्थ्यांना हातभार दिला मात्र कधीही त्याची प्रसिद्धी केली नसल्याचे सांगितले. गोपाळकृष्ण गोखले कॉलेजचे माजी प्रा.एस. डी. पाटील, दिलीप पवार, चंद्रकांत यादव, बी. जी. जाधव, चंद्रकांत मेहता, अशोक भाई शहा आदी उपस्थित होते. नागरिका एक्सपोर्ट कंपनीच्या कामगार संघटनेचे दिलीप मिसाळ, ॲड. ओंकार नेवगी, ॲड. चेतन शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55785 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top