मंत्री उदय सामंत प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री उदय सामंत प्रेस
मंत्री उदय सामंत प्रेस

मंत्री उदय सामंत प्रेस

sakal_logo
By

इचलकरंजीच्या विकासासाठी कटिबद्ध
मंत्री उदय सामंत; खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याचे कौतुक

इचलकरंजी, ता. ६ : तांत्रिक अडचणी दूर करीत इचलकरंजीला महापालिका करण्यासाठी महाविकास आघाडी शासनाने मंजुरी दिली. भविष्यातही इचलकरंजीच्या विकासासाठी आघाडी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली. खासदार धैर्यशील माने यांच्यासह आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. सामंत म्हणाले, ‘‘महापालिका होण्यासाठी सर्वानींच प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे आभार मानने गरजेचे आहे. विशेष करून खासदार माने यांनी सतत पाठपुरावा केला. गेली चार महिने ते या प्रश्नासाठी शासनाच्या पातळीवर पाठपुरावा करीत होते. त्यामुळे महापालिका करण्याचे खरे श्रेय त्यांना द्यावे लागेल. कांही तांत्रिक अडचणी असतांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मान्यता दिली. महापालिका झाल्यामुळे आता इचलकरंजीतील विकासाच्या संकल्पना पूर्ण होण्यास मदत होईल.’’
खासदार श्री. माने म्हणाले, ‘‘सहा वर्षाच्या कालखंडानंतर व महाविकास आघाडी शासनाच्या काळात फक्त इचलकरंजीला महापालिका करण्यास मंजुरी दिली. यासाठी कोणतीही हद्दवाढ व पुढील चार वर्षे कोणतीही करवाढ लादली जाणार नाही. पुढील काळात शासनाच्या सूचीत २८ वी महापालिका म्हणून इचलकरंजीची नोंद झाल्यानंतर विविध पायाभूत विकास कामांसाठी ठोक १०० कोटींचा निधी मिळणार आहे. आता या पुढील निवडणूका या महापालिका म्हणूनच होणार आहेत. तर यापुढे सुळकूड पाणी योजना मंजुरीचा आपला प्रयत्न राहणार आहे.’’
राष्ट्रवादीचे मदन कारंडे, नितीन जांभळे काँग्रेसचे शशांक बावचकर, राहूल खंजीरे, भाजपचे शशांक बावचकर यांनी यावेळी भूमिका मांडली. याप्रसंगी माजी आमदार सत्यजीत पाटील, उल्हास पाटील, सुजीत मिणचेकर, शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह रविंद्र माने, महादेव गौड, विठ्ठल चोपडे, उदयसिंह पाटील आदी उपस्थीत होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55792 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top