सूतदरातील तेजी-मंदीमुळे यंत्रमागधारक हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूतदरातील तेजी-मंदीमुळे यंत्रमागधारक हैराण
सूतदरातील तेजी-मंदीमुळे यंत्रमागधारक हैराण

सूतदरातील तेजी-मंदीमुळे यंत्रमागधारक हैराण

sakal_logo
By

सूतदरात तेजी-मंदीमुळे
यंत्रमागधारक हैराण
साठेबाजीचा संशय; संघटनांनी लक्ष घालण्याची मागणी
इचलकरंजी, ता. ६ : सूताच्या दरात अचानक होणारी वाढ व त्यानंतर एकदम होणारी घसरण यामुळे यंत्रमागधारक हैराण झाले आहेत. यामध्ये एका ग्रुपकडून सूताची साठेबाजी करण्यात येत असल्याचा संशय आहे. पण याबाबत कोणतीही तक्रार करता येत नसल्यामुळे यंत्रमागधारक हतबल आहेत. या प्रकाराला आळा न बसल्यास पुढील काळात मात्र तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
सूताचे दर स्थिर राहत नसल्यामुळे अनेकवेळा यंत्रमागधारकांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे किमान पंधरा दिवस तरी सूत दर स्थिर ठेवावेत, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून यंत्रमागधारक करीत आहेत. पण ठोस कृती झालेली नाही. आता तर सूताच्या क्षेत्रात दबदबा असलेल्या एका ग्रुपने अचानक किलो मागे २५ रुपयांची वाढ केली. त्यामुळे यंत्रमाधारकांची पंचाईत झाली. कांहीजणांनी या दरांने सूताची खरेदी केली. पण पून्हा अचानक २० रुपये दरामध्ये कपात केली. त्यामुळे यंत्रमागधारकांना आर्थिक फटका सहन करावा लागला.
यामागे केवळ साठेबाजी असल्याची चर्चा आता सामाजिक माध्यमातून होत आहे. याबाबत कारवाई करतांनाही मर्यादा पडतात. त्याचा गैरफायदा घेवून यंत्रमागधारकांना लुटण्याचे प्रकार केले जात आहेत. सूत दरातील या भयानक तेजी-मंदीमुळे सूताची खरेदी करायची की नाही, असा प्रश्न आता यंत्रमागधारकांसमोर निर्माण झाला आहे. यंत्रमागधारक संघटनांनी यामध्ये लक्ष घालून या प्रकारावर आळा घालण्याची मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55803 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top